• Mon. Nov 25th, 2024

    जेजे रुग्णालयातील डॉक्टरांचा ४ दिवसांनंतर अखेर संप मागे; पुन्हा पूर्ण क्षमतेने कामावर होणार रुजू

    जेजे रुग्णालयातील डॉक्टरांचा ४ दिवसांनंतर अखेर संप मागे; पुन्हा पूर्ण क्षमतेने कामावर होणार रुजू

    JJ Hospital Doctor Strike Set Back : जे. जे. रुग्णालयाच्या निवासी डॉक्टरांच्या मार्ड संघटनेने ३१ मे २०२३ पासून संप पुकारला होता. अखेर ४ दिवसांनंतर हा संप मागे घेण्यात आला आहे.

     

    ‘जेजे’तील संप मागे
    म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई : जे. जे. मार्डच्या निवासी डॉक्टरांनी प्रमुख चार मागण्यांसाठी केलेला संप मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. शिष्यवृत्ती वेतन आणि थकबाकी मिळण्याचे आश्वासन मिळाले असल्याचे रविवारी सकाळी घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगण्यात आले. त्यामुळे हा संप मागे घेत असून पुन्हा पूर्ण क्षमतेने कामावर रुजू होत असल्याचे सांगत निवासी डॉक्टरांनी सेवा देण्यास सुरुवात केली.नेत्रशल्य चिकित्सा विभागातील निवासी डॉक्टरांना डॉ. लहाने आणि डॉ. रागिणी पारेख हे निवासी डॉक्टरांना कोणत्याही प्रकारची शस्त्रक्रिया करण्याचे प्रशिक्षण देत नाहीत. त्यामुळे त्यांची बदली करून नवीन नियुक्ती करण्यात यावी, अशी मागणी करत जे. जे. रुग्णालयाच्या निवासी डॉक्टरांच्या मार्ड संघटनेने ३१ मे २०२३ पासून संप पुकारला होता. वैद्यकीय शिक्षण आणि औषधी द्रव्ये विभागाने शनिवारी डॉ. लहाने आणि डॉ. पारेख यांचा राजीनामा मंजूर केला. तसेच डॉ. पारेख यांच्या जागेवर डॉ. रवी चव्हाण यांची नियुक्ती करण्यात आली. तसेच शिष्यवृत्ती वेतन आणि थकबाकी यासंदर्भात वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन आणि जे. जे. रुग्णालय प्रशासनासोबत झालेल्या बैठकीमध्ये सकारात्मक प्रतिसाद मिळाला. तसेच यावर तात्काळ कार्यवाही करण्याचे आदेश वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांनी दिले आहेत. त्यामुळे आम्ही संप मागे घेत असून सोमवारपासून पुकारण्यात येणारा राज्यव्यापी संप ही मागे घेण्यात येणार असल्याचे केंद्रीय मार्डकडून जाहीर करण्यात आले. तसेच रविवारी लगेचच निवासी डॉक्टर सेवेमध्ये रुजू झाले.
    खाद्यतेल पुन्हा आवाक्यात? मुबलक आयात व साठ्यामुळे दर घसरणीचे संकेत, कशा असतील किंमती?
    ‘निवासी डॉक्टरांच्या अनेक मागण्या मान्य झाल्या आहेत. तर, काही मागण्या मान्य करण्याबाबत आश्वासन देण्यात आले आहे. त्यामुळे, या डॉक्टरांनी राज्यव्यापी आंदोलन मागे घेण्याबाबत पत्र दिले आहे’, अशी माहिती जे. जे. रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ. पल्लवी सापळे यांनी दिली.

    जवळच्या शहरातील बातम्या

    Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *