• Sat. Sep 21st, 2024

रेल्वेगाडीच्या प्रसाधनगृहाची काच फोडून आरोपीचे पलायन; हावडा-पुणे दुरांतो रेल्वेगाडीतील घटना

रेल्वेगाडीच्या प्रसाधनगृहाची काच फोडून आरोपीचे पलायन; हावडा-पुणे दुरांतो रेल्वेगाडीतील घटना

म. टा. प्रतिनिधी, पुणे : सराफ व्यावसायिकाची फसवणूक करणाऱ्या दोन कारागिरांना पश्चिम बंगालमधून रेल्वेने पुण्यात आणले जात असताना, एक आरोपी पोलिसांना चकवून पसार झाल्याची घटना नागपूर ते बुटीबोरी स्थानकादरम्यान घडली. हावडा-पुणे दुरांतो रेल्वेगाडीतील प्रसाधनगृहाची काच फोडून आरोपी पळाला. संजय तपनकुमार जाना (रा. गोपीनाथ भीतरजाल, पश्चिम बंगाल) असे या आरोपीचे नाव आहे.अशी आहे घटना

संजय जाना आणि सौरभ प्रसन्नजीत माईती हे दोघे दागिने घडविणाऱ्या कारागिराकडे कामाला होते. दागिने घडविण्यासाठी दिलेले ३८१ ग्रॅम सोने घेऊन दोघे फरारी झाले होते. त्यानंतर फरासखाना पोलिस ठाण्यात सहा मे रोजी फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. फरासखाना पोलिसांचे पथक आरोपींना पकडण्यासाठी पश्चिम बंगालला गेले होते. तेथे पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले.

फरासखाना पोलिस हावडा-पुणे दुरंतो एक्स्प्रेसने जाना याला घेऊन पुण्याकडे येत होते. त्या वेळी शुक्रवारी दुपारी अडीचच्या सुमारास जाना याने प्रसाधनगृहात जाण्याची विनंती पोलिसांकडे केली. त्यानुसार त्याला प्रसाधनगृहात जाण्याची परवानगी दिली. त्याने आत जाऊन दरवाजा बंद करून घेतला. बराच वेळ झाल्यानंतरही तो प्रसाधनगृहातून बाहेर आला नाही. पोलिसांनी दरवाजा वाजविला असता, त्याने प्रतिसाद दिला नाही. पोलिसांनी दरवाजा उघडला असता आरोपी प्रसाधनगृहाच्या खिडकीची काच फोडून पसार झाल्याचे लक्षात आले.

स्काउट गाइडच्या नोकरीचे आमिष दाखवून कोट्यवधींची फसवणूक; सहा ठकबाजांविरुद्ध गुन्हा दाखल
या प्रकरणी नागपूर रेल्वे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, पोलिसांनी माईती याला पुण्यात आणले असून, न्यायालयाने त्याला आठ दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed