• Sat. Sep 21st, 2024

शेअरमधील तोट्यामुळे तरुण झाला ‘ड्रग्ज तस्कर’; कोथरुडमधील उच्चशिक्षिताची कहाणी वाचून धक्का बसेल

शेअरमधील तोट्यामुळे तरुण झाला ‘ड्रग्ज तस्कर’; कोथरुडमधील उच्चशिक्षिताची कहाणी वाचून धक्का बसेल

पुणे : शेअर बाजारात झालेले नुकसान भरून काढण्यासाठी एक उच्चशिक्षित तरुण अमली पदार्थ तस्करीच्या मार्गाला लागल्याचा धक्कादायक प्रकार पोलिस तपासात उघड झाला आहे. संबंधित तरुण यापूर्वी स्वतःच्या व्यसनासाठी एलएसडी स्टॅम्प खरेदी करत होता. त्यातूनच त्याला खरेदी-विक्रीची ‘लिंक’ लागली.काय आहे प्रकरण?

‘ऑनलाइन डिलिव्हरी ॲप’द्वारे अमली पदार्थांची खरेदी-विक्री करणाऱ्यांना गुन्हे शाखेच्या अमली पदार्थविरोधी पथकाने अटक केली. या कारवाईत १२५० एलएसडी स्टॅम्प पोलिसांनी जप्त केले. त्याची किंमत सुमारे सव्वा कोटी रुपयांच्या घरात आहे. या प्रकरणी पोलिसांनी सुरुवातीला कोथरूड येथून एका तरुणाला ताब्यात घेतले होते. त्याच्याकडून ३० मिलिग्रॅम एलएसडी स्टॅम्प जप्त करण्यात आले होते. पोलिसांनी त्याच्याकडे सखोल तपास केल्यावर अन्य पाच आरोपींची नावे पुढे आली. या प्रकरणी आतापर्यंत एकूण पाच जणांना अटक झाली असून, सहाव्या आरोपीचा शोध घेतला जात आहे. अटक पाचही आरोपींकडे तपास केल्यानंतर पाचपैकी एका तरुणाने मोठ्या प्रमाणावर एलएसडी स्टॅम्पची ऑनलाइन खरेदी करून ते अन्य चौघांना विक्री केल्याचे समोर आले.

अन्य आरोपींना एलएसडी स्टॅम्प पुरविणाऱ्या तरूणाने ‘बीबीएची’ची पदवी मिळवली आहे. करोनापूर्वी तो एका कंपनीतही नोकरी करीत होता. मात्र, करोना काळात नोकरी सोडावी लागली. त्यामुळे त्याने पैसे कमाविण्यासाठी शेअर बाजारात व्यवहार सुरू केले; तसेच त्याने जास्त परताव्याच्या आमिषाने शेअरमध्ये गुंतवणकीसाठी एका व्यक्तीला एकरकमी पाच लाख रुपये दिले होते. त्या व्यक्तीने संबंधित तरुणाची फसवणूक केली. स्वतः करीत असलेल्या व्यवहारांतही त्याला मोठ्या प्रमाणावर नुकसान सहन करावे लागले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार संबंधित तरुणाचे सुमारे १५ लाख रुपयांचे नुकसान झाले होते. एवढ्या पैशांचे काय केले, याबाबत कुटुंबीयांना काय सांगणार? या विचाराने तो नैराश्यग्रस्त झाला होता.

अन् निवडला झटपट पैसे कमाविण्याचा मार्ग

त्या तरुणाने नुकसान भरून काढण्यासाठी झटपट पैसे कमाविण्याचा मार्ग निवडला. गेल्या काही वर्षांत एलएसडी स्टॅम्पच्या खरेदी-विक्रीची यंत्रणा त्याला माहिती झाली होती. त्यातूनच त्याने मोठ्या प्रमाणावर मालाची मागणी करून ग्राहकांना विक्री करण्यास सुरुवात केली होती. मात्र, हा गंभीर गुन्हा असल्याकडे त्याने काणाडोळा केला.

आरोपी उच्चशिक्षित

मुख्य आरोपी तरुणाने बीबीएची पदवी मिळवली आहे. तर, अन्य आरोपींपैकी एकाने विधी शाखेची पदव्युत्तर (एलएलएम) पदवी मिळवली आहे. तर, एक जण आयटी इंजिनीअर असून, खासगी कंपनीत नोकरी करतो. एक जण एमबीएचे शिक्षण घेत असून, एक जण इंटिरिअर डिझायनर म्हणून काम करतो. या सर्वांची कौटुंबिक परिस्थितीदेखील चांगली आहे. काहींचे वडील किंवा आई राज्य सरकारी सेवेत उच्च पदांवर आहेत.
चार कोयते हातात घेऊन व्हिडिओ काढला, सोशल मीडियावर पोस्टही केला; त्यानंतर जे झालं…
१२५०
पोलिसांनी जप्त केलेले एलएसडी स्टॅम्प
सुमारे १.२५ कोटी रुपये
जप्त केलेल्या स्टॅम्पची किंमत
३० मिलिग्रॅम
कोथरूडमधील तरुणाकडे सापडेलेल स्टॅम्प

आतापर्यंत अटक केलेले आरोपी
(क्रमशः)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed