• Sat. Sep 21st, 2024

मध्यरात्री फिरणं महागात पडलं, लोणावळ्यात अपघात, पुण्यात शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा मृत्यू

मध्यरात्री फिरणं महागात पडलं, लोणावळ्यात अपघात, पुण्यात शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा मृत्यू

म. टा. प्रतिनिधी, लोणावळा : लोणावळ्यातील टायगर पॉइंट येथे मध्यरात्री दुचाकीवर फिरायला आलेल्या महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची दुचाकी मार्गालगतच्या दुभाजकाला धडकून झालेल्या अपघातात एकाचा मृत्यू झाला, तर दोघे जखमी झाले. हा अपघात शुक्रवारी पहाटे पाचच्या सुमारास टायगर पॉइंट रोडवरील एअर फोर्सजवळील तीव्र उतारावरील वळणावर झाला.

मोहन ज्ञानेश्वर मोरे (वय २२, रा. बंडगार्डन, पुणे, मूळ पिंपळगाव सय्यदमियाँ, जि. परभणी) असे अपघातात मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. श्रीराम संजय मोरे (वय १९, रा. बंडगार्डन, पुणे, मूळ पिंपळगाव सय्यदमियाँ, जि. परभणी), रितेश सोमनाथ नलावडे (वय २१, रा. पुणे, मूळ टेंभुर्णी, जि. सोलापूर) जखमी झाले. तिघेही पुण्यातील एका महाविद्यालत शिकत होते.

IND vs AUS: चेंडू नव्हे आगीचा गोळा टाकतोय हा गोलंदाज; WTC फायनलमध्ये भारताची डोकेदुखी वाढली

जखमी श्रीराम संजय मोरे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार तीन जण दुचाकीवरून (एमएच २२ एएक्स ०८७३) मध्यरात्री दोनच्या सुमारास पुण्याहून कार्ला येथील आई एकवीरा देवीच्या दर्शनासाठी आले होते. मंदिर बंद असल्याने ते तेथून टायगर पॉइंट येथे फिरायला आले. टायगर पॉइंट परिसरात फिरल्यानंतर पहाटे पाचच्या सुमारास ते पुन्हा एकवीरा देवीच्या दर्शनासाठी निघाले. त्या वेळी टायगर पॉइंट ते आयएनएस शिवाजीदरम्यान असलेल्या एअरफोर्स स्टेशन येथील एका वळणावर तीव्र उतारावर नियंत्रण सुटल्याने त्यांची दुचाकी लोखंडी दुभाजकावर जोरात आदळली.

भीषण अपघातात २८८ जणांचा मृत्यू; जबाबदार कोण? रेल्वेच्या रिपोर्टमधून धक्कादायक कारण उघडकीस

जखमींनी प्रसंगावधान राखून रस्त्याने जाणाऱ्या एका कारला थांबवून मदत मागितली. कारचालकाने तिन्ही तरुणांना लोणावळ्यातील एका खासगी रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी तपासणी करून मोहन मोरे यांचा मृत्यू झाल्याचे सांगितले. लोणावळा शहर पोलिस या प्रकरणी पुढील तपास करीत आहेत.

सुरक्षा कवच शिवाय धावली ट्रेन! ओडिशातील भयावह रेल्वे दुर्घटनेतील धक्कादायक अपडेट समोर

तहसीलदारावर कारवाईची मागणी, पुलावर चढून शोले स्टाइल आंदोलन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed