• Sat. Sep 21st, 2024

मुलाचा खून झालाय, बापाने संशयितांची नावंही सांगितली, इतक्यात पोलीस म्हणाले बेबी बाई कुठेय?

मुलाचा खून झालाय, बापाने संशयितांची नावंही सांगितली, इतक्यात पोलीस म्हणाले बेबी बाई कुठेय?

धुळे : मुलाचा खून झाल्याची फिर्याद बापाने पोलिसांनी दिली. मारेकऱ्यांची नावंही सांगितली. त्यानुसार पोलिसांनी संशयितांना ताब्यात घेतले, चौकशी सुरु झाली; पण हा गुन्हा दिसतो तितका साधा नाही, कुठेतरी पाणी मुरतंय, ही बाब सहायक निरीक्षक जयेश खलाणे यांच्या लक्षात आली. त्यांनी चक्रं फिरवली आणि स्वत: पत्नीनेच पतीचा खून केल्याचा भयंकर प्रकार उघडकीस आला.

धुळे जिल्ह्यात शिरपूर तालुक्यातील सांगवी पोलिस ठाण्यांतर्गत असलेल्या झेंडेअंजन जवळच्या पुट्यापाडा येथील रहिवासी सिग्रेट देवसिंह पावरा (५६) यांनी पोलिस ठाणे गाठले. आपला मुलगा रामदास पावरा याची काल सायंकाळी हत्या करण्यात आली आहे. गहाण ठेवलेली वनजमीन सोडवण्याच्या वादातून मारहाण करुन त्याचा खून केल्याचे त्यांनी पोलिसांना सांगितले.

बापाने संशयितांची नावेही सांगितली. त्यावरुन पोलिसांनी गावातून मिथून पावरा, भाया पावरा व युवराज पावरा यांना ताब्यात घेतले. त्यांची कसून चौकशी सुरु केली. मात्र, त्यांच्या माहितीतून खुनात त्यांचा सहभाग निष्पन्न होत नव्हता. त्यामुळे सहायक निरीक्षक जयेश खलाणे यांनी तपासाची दिशा बदलण्याचा निर्णय घेतला.

Mumbai Crime : आईला संपवलं, बॉडीजवळ रक्ताने मेसेज; तिला कंटाळलेलो, स्माईलीमुळे मुलाचं बिंग फुटलं

मृत रामदास पावरा याच्या कुटुंबाबाबत माहिती घेताना त्यांना एक धक्कादायक बाब समजली. रामदासचा मृत्यू झाल्याच्या दिवसापासून त्याची पत्नी सुनंदा तथा बेबीबाई पावरा बेपत्ता झाली होती. तिचा शोध घेण्यासाठी अधिकारी व कर्मचाऱ्यांचे विशेष पथक रवाना करण्यात आले.

फेसबुकवरील प्रेम ‘लिव्ह इन’पर्यंत आलं, संशयाचं भूत डोक्यात शिरलं, एकाच वादात सगळं संपवलं!

अखेर खैरखुटी येथे तिचा शोध लागला. तिला सांगवी पोलिस ठाण्यात नेण्यात आले. चौकशीत सुरूवातीला तिने उडवाउडवीची उत्तरे दिली. मात्र पोलिसांनी कसून चौकशी करताच तिने माहिती दिली. ती ऐकून पोलिसांनाही धक्काच बसला.

विवाहितेला लॉजवर बोलवून गळा चिरला, शेवटचा सेल्फी ठरला टर्निंग पॉईंट
सुनंदाचा पती रामदासला मद्याचे व्यसन होते. मद्यधुंद होऊन तो तिला नेहमी शिवीगाळ व मारहाण करीत होता. या त्रासाला वैतागून तिने अखेर त्याचा काटा काढण्याचा निर्णय घेतला. गुरूवारी सायंकाळी तिने पतीला स्वत:च भरपूर दारु पाजली. त्याच्या डोक्यावर लाटण्याने प्रहार करुन बेशुद्ध केले. त्यानंतर घरातील दोरी घेऊन त्याचा गळा आवळला. तो मेल्याची खात्री झाल्यानंतर ती घरातून पळून केली.

मधुचंद्राला बायकोचा नकार, नाशिकच्या नवरदेवाने खडसावतच म्हणाली, दोनदा लग्न झालंय, तुमचे…
खून झाल्यापासून अवघ्या काही तासांतच संशयितांचा शोध घेऊन अटक करीत गुन्ह्याचा उलगडा केल्याबद्दल सहायक निरीक्षक जयेश खलाणे यांचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कौतुक केले. पोलिस अधीक्षक संजय बारकुंड, अपर अधीक्षक किशोर काळे, डीवायएसपी अंसाराम आगरकर, स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक हेमंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक जयेश खलाणे, उपनिरीक्षक संदीप पाटील, सुनील वसावे, कृष्णा पाटील, सहायक उपनिरीक्षक जयराज शिंदे, कैलास जाधव, हवालदार संजय सूर्यवंशी, गंगाधर सोनवणे, कैलास कोळी, खसावद, पोलिस नाईक अनिल शिरसाट, सुनील साळुंखे, योगेश मोरे, रोहिदास पावरा, संजय भोई, कृष्णा पावरा, इसरार फारुकी, अश्विनी चौधरी यांनी ही कामगिरी बजावली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed