• Sat. Sep 21st, 2024

संजय राऊतांच्या थुंकण्यावर जितेंद्र आव्हाडांची प्रतिक्रिया, शरद पवारांचा उल्लेख करत म्हणाले…

संजय राऊतांच्या थुंकण्यावर जितेंद्र आव्हाडांची प्रतिक्रिया, शरद पवारांचा उल्लेख करत म्हणाले…

सोलापूर : राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड शनिवारी तुळजापूरला जाताना काही वेळ सोलापूरला विश्रांती केली. यावेळी राष्ट्रवादीच्या नेत्यांची आणि कार्यकर्त्यांची भेट घेतली. या भेटीनंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. पत्रकार परिषदेत शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांच्या थुंकण्यावर प्रश्न विचारताच जितेंद्र आव्हाड यांनी अधिक बोलणं टाळलं. पण त्यांनी दिलेली प्रतिक्रिया आता चर्चेत आहे.

शिवसेनेचे खासदार संजय राऊत हे थुंकण्यावरून सध्या वादात आहेत. यावर जितेंद्र आव्हाड यांनी बोलकी प्रतिक्रिया दिली आहे. ‘ही प्रत्येकाची स्टाईल असते, त्यांच्या त्यांच्या स्टाईल प्रमाणे बोलत असतात. आमच्यावर शरद पवार यांचे संस्कार आहेत. आम्ही कुणाचंही नाव घेतल्यावर थुंकत नाही. आम्हाला शरद पवार यांची भीती आहे’, असं म्हणत जितेंद्र आव्हाड यांनी एक प्रकारे संजय राऊत यांना टोला लगावला आहे.

शिंदे-पवार भेटीने कोणतंही वातावरण ढवळलेलं नाही, मुख्यमंत्र्यांचं सिंहासन आधीच हललं आहे; संजय राऊतांनी डिवचलं

‘एकनाथ शिंदे यांचे विचार पटत नाही, बाकी मैत्री आहे’

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट झाली. यावर जितेंद्र आव्हाड बोलले. ‘शरद पवार यांचे अनेक नेत्यांशी आणि उद्योगपतींशी वैयक्तीक संबंध आहेत. आम्ही व शरद पवार कुणाशी वैयक्तीक द्वेष ठेवत नाही. आमची विचारांची लढाई आहे. एकनाथ शिंदे यांचे विचार आम्हाला पटत नाही. बाकी मैत्री आमची राहील’, असं जितेंद्र आव्हाड म्हणाले.

वाऱ्याची दिशा बदलली, वचपा काढण्यासाठी भालकेंना ऑफर, पवारांच्या शिलेदाराचं टेन्शन वाढलं!
‘भाजपला महाराष्ट्रात मोठं करण्यात पंकजाच्या वडिलांची व मामाची मोठी भूमिका’

गोपीनाथ मुंडे यांच्या कन्या पंकजा मुंडे यांच्या बाबतही आव्हाड यांनी सांगितलं. ‘पंकजा ही भाजपत राहील, तिला माध्यमांनी बाहेर ढकलू नये. तसेच महाराष्ट्र राज्यात भाजपला मोठं करण्यात तिच्या वडिलांचा आणि मामाचा मोठा हात आहे. पंकजाला भाजपमध्ये डावललं जातंय. भाजप नेत्यांना माहितीय कोण तिला डावलतय. हे भाजप नेत्यांना विचारा’, असं आव्हाड म्हणाले.

‘सिंधी समाजाबाबत आक्षेपार्ह बोललोच नाही’

‘ठाणे पोलिसांना दिलेला एकसूत्री कार्यकम आहे. दर आठवड्याला जितेंद्र आव्हाडवर एक गुन्हा दाखल केला पाहिजे. ठाणे पोलिसांनी एका खोट्या क्लिपच्या आधारे माझ्यावर गुन्हा दाखल केला आहे. खरं तर क्लिप तपासायची असते, फॉरेन्सिक लॅबला पाठवून त्याची सत्यता पडताळून पाहायची असते. पण तसं पोलिसांनी केलं नाही. मी बोललो होतो,”सौ कुत्ते मिलकर एक शेर का शिकार नही कर सकते”, त्या जंगली या शब्दाच्या ठिकाणी दुसरा शब्द आहे. सिंधी समाजापेक्षा शिंदे गटाला अधिक घाई होती. पण जितेंद्र आव्हाड घाबरणार नाही. ही क्लिप घेऊन येणाऱ्यावर गुन्हे दाखल करा’, अशी मागणी पोलीस आयुक्तांकडे केल्याचं जितेंद्र आव्हाड म्हणाले.

यल्लम्मा देवीच्या यात्रेवरून परतताना काळाचा घाला, ट्रकने कारला चिरडलं, दोन मुलांसह सहा ठार
अहिल्यादेवी नगरवरून ‘कान खाजवून’ प्रतिक्रिया दिली

अहमदनगर नगर जिल्ह्याचे नाव अहिल्यादेवी नगर असं नामकरण केल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घोषित केलं होतं. राज्यभरातील विविध पक्षाचे नेते यावर प्रतिक्रिया देत आहेत. राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांना याबाबत विचारण्यात आलं आणि त्यांनी कान खाजवून प्रतिक्रिया दिली. ‘हे कान खाजवून जस बरं वाटतंय, तसं बर वाटल असेल. अहमदनगर जिल्ह्याला शहाजी आणि पिरजी या दोघांचा देखील इतिहास आहे’, असं आव्हाड यांनी सांगितलं.

‘चित्रपटाच्या माध्यमांतून द्वेष’

काश्मीर फाईल्स, केरला स्टोरी चित्रपटानंतर आता गोध्रावर टिझर रिलीज झाला आहे. यावरही आव्हाड यांनी प्रतिक्रिया दिली. ‘गेल्या वीस वर्षांपासून भारतात देशप्रेमवर एखादा सिनेमा आला का? चित्रपट हे असे माध्यम आहे जे लोकांपर्यंत थेट पोहोचतं. पण चित्रपटाच्या माध्यमांतून द्वेष पसरवला जात आहे’, असा आरोप जितेंद्र आव्हाड यांनी केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed