• Sun. Sep 22nd, 2024

पाइपलाइनमध्ये राहिला, सिग्नलवर गजरे विकले, दिव्याखाली अभ्यास केला, किरणचे दहावीत मोठी यश

पाइपलाइनमध्ये राहिला, सिग्नलवर गजरे विकले, दिव्याखाली अभ्यास केला, किरणचे दहावीत मोठी यश

ठाणे : वडील नाहीत, रस्त्यावर पाइपलाइनला राहून आई फुलांचे गजरे, हार विकून कसेबसे कुटुंब चालवते. आईला मदत व्हावी म्हणून किरण काळे हा सिग्नलवर गजरे विकण्याचे काम करतो. मात्र अशा खडतर आणि दिशाहीन प्रवासात तो दुसऱ्या बाजूला शालेय शिक्षण घेत घेत इयत्ता १० वीची परीक्षा देतो आणि ६० टक्के गुण मिळवून पास होतो. या यशाने किरणने आपल्या जगण्याचा मार्ग तयार केला आणि रस्त्यावरील मुलांसाठी एक आदर्श निर्माण केला. अशा या किरणच्या नेत्रदीपक यशाची चर्चा ठाण्यात ऐकायला मिळत आहे.

किरण आईसोबत रस्त्यावरच राहतो. आर्थिक परिस्थिती अत्यंत हालाखीची असल्यामुळे त्याची सुरुवातीची शाळेची काही वर्षे वाया गेली. किरणची आई मीना या नौपाडा ट्रॅफिक जंक्शनवर फुले, हार, गजरे विकण्याचे काम करतात. किरण आईला हार विकून देत हातभार लावत आला आहे. समर्थ भारत व्यासपीठ या सामाजिक संस्थांच्या कार्यकर्त्यांची नजर हार विकणाऱ्या किरणवर पडली. त्यांनी त्याला सिग्नल शाळेत आणले. किरणसारख्या मुलांना शिक्षण घेता यावे यासाठी या संस्थेने ठाणे महानगरपालिकेच्या मदतीने सिग्नल शाळा सुरू केली आहे.

तटरक्षक दलाची मोठी कामगिरी; अथांग समुद्रातून बाहेर काढले २० कोटी रुपये किमतीचे सोने, वाचा काय आहे प्रकरण
सिग्नल शाळेचे समन्वयक भटू सावंत यांनी माहिती देताना सांगितले की, आम्ही किरणला इयत्ता तिसरीमध्ये प्रवेश दिला. त्यानंतर त्याला सरस्वती हायस्कूलमध्ये दाखल केले. त्याची सुरुवातीची दोन वर्षे गळली असली तरी त्याने इयत्ता तिसरीत अभ्यास करून ती भरून काढली.

आपल्या यशाबाबत बोलताना किरण म्हणाला की, ‘ही माझ्यासाठी जगण्याची लढाई होती. दररोज हार विकण्याशिवाय आमचं रोजचं जीवन चालूच शकत नव्हते. त्यामुळे हे काम एकदिवसही टाळता येण्यासारखं नव्हतं. त्यामुळे मी माझ्या आईला तिच्या कामात हातभार लावत होतो. फुलं विकत आणणे आणि नंतर हार आण गजरे तयार करून ती विकणे असे काम मी करत असतो. रस्त्यावरील दिव्याखाली मी अभ्यास केला आहे.

भंडाऱ्यात अनोखा विवाहसोहळा; नवरीची धमाकेदार एन्ट्री, संविधानाची शपथ घेऊन बांधली लग्नगाठ, सर्वत्र होतंय कौतुक
मला पोलीस अधिकारी बनायचे आहे- किरण

खडतर परिस्थितीशी झगडत मिळवलेले हे यश किरणने आपल्या वर्गमित्रांसोबत सिग्नल शाळेत आनंदाने साजरे केले. मला पोलीस अधिकारी बनायचे आहे. तसेच माझ्या आईसाठी मला घरही विकत घ्यायचे आहे, असे आपले स्वप्न असल्याचे किरणने सांगितले.

नवी मुंबईकरांसाठी मोठी बातमी; या घरांना देणार मालमत्ता करमाफी, मुख्यमंत्र्यांनी मागवला प्रस्ताव

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed