• Mon. Nov 25th, 2024

    हलाखीच्या परिस्थितीत लढली, आता आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचं नेतृत्व; मेंढपाळाच्या लेकीची गरुड भरारी

    हलाखीच्या परिस्थितीत लढली, आता आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचं नेतृत्व; मेंढपाळाच्या लेकीची गरुड भरारी

    बारामती : अतिशय खडतर परिस्थितीतून पुढे येत बेसबॉलमध्ये आंतरराष्ट्रीय सामन्यात भारतीय संघाचं कर्णधार पद सांभाळणाऱ्या बारामतीच्या रेश्मा पुणेकरला महाराष्ट्र सरकारचा सर्वोच्च शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार जाहीर झाला आहे. तिच्या या यशाबद्दल तिचं सर्व स्तरातून कौतुक होत आहे.पुरस्कारासाठी ३० जून रोजी संपणारं वर्ष धरून त्या पूर्वीच्या पाच वर्षांपैकी तीन वर्षांमध्ये त्या खेळाडूने राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरांवर केलेल्या कामगिरीचं आणि क्रीडानैपुण्याचं मूल्यमापन केलं जातं.

    ग्रामीण भागातून येऊन देशाचं कर्णधारपद स्वीकारून प्रतिनिधित्व करणारी रेश्मा पुणेकरने तिच्या कुटुंबासह देशाचीही शान वाढवली आहे. रेश्माने घरच्या आर्थिक परिस्थितीवर मात करत जिद्द, चिकाटी आणि आत्मविश्वासाच्या जोरावर आजपर्यंत दोन आंतरराष्ट्रीय सामने चीन आणि हॉंगकॉंग या देशामध्ये खेळले आहेत. तिने २३ राष्ट्रीय सामन्यात महाराष्ट्राच्या संघाचं प्रतिनिधित्व केलेलं आहे.

    Mata Superwomen: मेंढपाळाची लेक हाँगकाँगमध्ये करणार भारताचं नेतृत्व, बारामतीच्या तरुणीचा थक्क करणारा प्रवास
    २८ राज्यस्तरीय सामने तसंच ४ सुवर्ण पदकं, ६ रजत पदकं, तीन कास्य पदक आणि रागिणी पुरस्कार, राज्यस्तरीय खेलरत्न पुरस्कार, सरदार धुळोजी मोरे वीरता पुरस्कार अशा अनेक पुरस्कारांनी रेश्माला सन्मानित करण्यात आलं आहे.

    तीन फूट उंची, पण कर्तृत्व उत्तुंग शिखराएवढं; तिने जिद्दीने उभारला व्यवसाय, पूजा घोडकेची प्रेरणादायी गोष्ट
    आजपर्यंत रेशमाचा तब्बल बारा वर्षांचा खेळातील प्रवास हा ग्रामीण भागातील तरुणांसाठी प्रेरणादायी आहे. तिने केलेली प्रचंड मेहनत, कष्ट यामुळेच रेश्मा केवळ बारामतीच नव्हे तर देशाचं नाव बेसबॉल या खेळामध्ये उंचावत आहे. सध्या रेश्मा सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे येथील शारीरिक शिक्षण विभागात एम. पी. एडचा अभ्यास करत आहे. ग्रामीण भागातील आंतरराष्ट्रीय खेळाडूला महाराष्ट्र राज्य सरकारचा सर्वोच्च शिव छत्रपति राज्य क्रिडा पुरस्कार जाहीर झाल्यामुळे तिचं सर्वत्र कौतुक होत आहे.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *