• Sat. Sep 21st, 2024

संत तुकाराम महाराजांच्या पालखीसाठी राजा-सोन्या अन् सोन्या-खासदार बैलजोडीला मान

संत तुकाराम महाराजांच्या पालखीसाठी राजा-सोन्या अन् सोन्या-खासदार बैलजोडीला मान

देहू, पुणे : जगद्गुरु संतश्रेष्ठ तुकाराम महाराज यांच्या ३३८ व्या पालखी सोहळ्यातील बैल जोडीचा मान देहू गावातील सुरेश दिगंबर मोरे व पिंपळे सौदागर येथील महेंद्र बाळकृष्ण झिंजुर्डे यांच्या बैल जोडीला मिळाला आहे. चौघड्यासाठी बैल जोडीचा मान चिंबळी तालुका खेड येथील सत्यवान ज्ञानेश्वर जैद यांच्या बैल जोडीला मिळाला असल्याची माहिती जगद्गुरु संत तुकाराम महाराज संस्थानकडून प्रसिद्धी पत्राद्वारे देण्यात आली आहे.

संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्र्वर महाराज पालखी सोहळा अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. संत तुकाराम महाराजांच्या ३३८ व्या पालखी सोहळ्याचा पालखी रथ ओढण्याची सेवा करण्याची संधी देहूगाव येथील श्री संत तुकाराम महाराजांच्या वंशजांच्या सुरेश दिगंबर मोरे यांच्या सोन्या व खासदार तर पिंपळे सौदागर येथील महेंद्र बाळकृष्ण झिंजुर्डे यांच्या राजा- सोन्या व चौघडा गाडीला जुंपण्याचा मान चिंबळी येथील सत्यवान जैद यांच्या राजा व सर्जा बैलजोडीला मिळाला आहे.

जेजुरीतील विश्वस्तांचा वाद काय आहे? स्थानिक आंदोलनाला का बसलेत? A to Z माहिती
पालखी रथाला जोडण्यासाठी सक्षम बैलजोडींचा शोध घेण्यासाठी इच्छुक बैलजोडी मालकांकडून अर्ज मागविण्यात आले होते. यात पालखी रथाला जुंपण्यसाठी जवळपास १८ बैलजोडी मालकांचे अर्ज आले होते. तर चौघड्याच्या गाडीसाठी चार बैलजोडी मालकांनी अर्ज केले होते.
त्यात संस्थांकडून स्थानिक नागरिक सुरेश मोरे यांच्या बैलजोडीला मान देण्यात आला. तर चौघड्याच्या रथासाठी सत्यवान जैद यांच्या राजा – सर्जा बैलजोडीची निवड करण्यात आली आहे.

बैलगाडा शर्यतीत मुलगा आला आडवा; घोडीनं उडवलं, पण बैलानं वाचवलं; पुण्यातला थरारक VIDEO
या बैलांची निवड करताना त्यांचे वय, छाती, शिंगे, वशिंड, रंग, शेपटी, खूर, चाल आणि रथ ओढण्याची क्षमता याचे परीक्षण करण्यात आले. त्यानंतर या बैल जोडीची निवड करण्यात आली आहे. जगद्गुरु तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याची जय्यत तयारी सुरू असून बैल जोड्यांची निवड झाल्याने कुटुंबाला सेवा करण्याची संधी मिळाली आहे.

फुलांची सजावट अन् खास केक, पुणे-मुंबई धावणाऱ्या ‘डेक्कन क्वीन’चा 94 वा वाढदिवस

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed