• Sat. Sep 21st, 2024

मुंबईतील म्हाडाच्या १५ अतिधोकादायक इमारतींची यादी जाहीर; या भागातील इमारतींचा समावेश

मुंबईतील म्हाडाच्या १५ अतिधोकादायक इमारतींची यादी जाहीर; या भागातील इमारतींचा समावेश

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई : म्हाडाच्या मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळाने दरवर्षीप्रमाणे यंदाही पावसाळ्यापूर्वी जुन्या, मोडकळीस आलेल्या उपकरप्राप्त (सेस) इमारतींचे सर्वेक्षण केले आहे. त्याआधारे म्हाडाने १५ अतिधोकादायक इमारतींची यादी जाहीर केली असून त्यात गेल्या वर्षी अतिधोकादायक म्हणून जाहीर केलेल्या सात इमारतींचा समावेश आहे. या अतिधोकादायक इमारतींमध्ये ४२४ निवासी आणि १२१ अनिवासी असे एकूण ५४५ रहिवासी आहेत.मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळाने जाहीर केलेल्या १५ अतिधोकादायक इमारतींपैकी १५५ रहिवाशांनी निवाऱ्याची स्वतःच पर्यायी व्यवस्था केली आहे. आत्तापर्यंत २१ रहिवाशांना संक्रमण शिबिरात स्थलांतरित केले आहे. त्यासह २२२ रहिवाशांची व्यवस्था संक्रमण शिबिरात केली जाणार असल्याचे म्हाडाने स्पष्ट केले आहे.

या इमारती धोकादायक

४-४ ए,नवरोजी हिल रोड क्र. १, जॉली चेंबर ( मागील वर्षीच्या यादीतील)
७४ निझाम स्ट्रीट (मागील वर्षीच्या यादीतील)
४२, मस्जिद स्ट्रीट (मागील वर्षीच्या यादीतील)
६१-६१ए , मस्जिद स्ट्रीट
२१२ जे पांजरपोळ लेन
१७३-१७५-१७९ व्ही के बिल्डिंग , प्रिन्सेस स्ट्रीट, काळबादेवी
२-४-६ नानुभाई देसाई रोड,
१-२३ नानुभाई देसाई रोड
३५१ ए, जे एस एस रोड मुंबई
३८७-३९१ बदामवाडी, व्ही. पी. रोड (मागील वर्षीच्या यादीतील)
१७ नारायण निवास, निकटवाडी
३१सी व ३३ ए, आर रांगणेकर मार्ग व १९ पुरंदरे मार्ग, गिरगाव चौपाटी (मागील वर्षीच्या यादीतील)
१०४-१०६, मेघजी बिल्डिंग, अ , ब व क विंग, शिवदास चापसी मार्ग (मागील वर्षीच्या यादीतील)
४० कामाठीपुरा चौथी गल्ली
लग्नाला आलेल्या संतोष बांगर यांच्यासमोर ‘५० खोके एकदम ओके’च्या घोषणा, खासदार संजय जाधव यांना केला चरणस्पर्श
अंतिम भूखंड क्र. ७२१ व ७२४ टीपीएस – ३ विभाग, इमारत क्रमांक ४० बी व ४२८, आत्माराम बिल्डिंग व पेनकर चाळ (मागील वर्षीच्या यादीतील)
संपर्क क्रमांक- मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळ, नियंत्रण कक्ष-रजनी महल, पहिला मजला, ८९-९५,ताडदेव रोड, ताडदेव, मुं. ३४. दूरध्वनी क्र. २३५३६९४५, २३५१७४२३, ९३२१६३७६९९. मुंबई महापालिकेचा नियंत्रण कक्ष. पालिका मुख्यालय, फोर्ट २२६९४७२५/२७

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed