• Mon. Nov 25th, 2024

    पिंपरीत पंधरा किलो गांजा जप्त; अंमली पदार्थविरोधी पथकाने केली कारवाई ,तिघांना अटक

    पिंपरीत पंधरा किलो गांजा जप्त; अंमली पदार्थविरोधी पथकाने केली कारवाई ,तिघांना अटक

    म. टा. प्रतिनिधी, पिंपरी : खेड तालुक्यातील सुपे गावातून १५ किलो ४५० ग्रॅम वजनाचा गांजा जप्त करण्यात आला असून, तिघांना पोलिसांनी अटक केली. ही कारवाई रविवारी (२८ मे) अंमली पदार्थविरोधी पथकाने केली. हा गांजा आरोपींनी विशाखापट्टणम येथून विक्रीसाठी आणला होता.विकास रोहिदास बदाले (वय २७, रा. तळेगाव एमाआयडीसी), शिवाजी वसंत भोसले (वय ३६, रा. करंजविहिरे), लक्ष्मण निवृत्ती कुंभार (वय ३७, रा. अंबोली) यांना पोलिसांनी अटक केली. विशाखापट्टणम येथील एक व्यक्तीवरही गुन्हा दाखल करण्यात आला.

    पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुपे गावातील मुक्ताई मंदिरासमोर तीन व्यक्ती गांजा विक्रीसाठी येणार असल्याची माहिती पोलिस शिपाई कपिलेश इगवे यांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून तिघांना ताब्यात घेतले. या वेळी बदाले आणि भोसलेकडे दोन लाख ५२ हजार १५० रुपयांचा १० किलो ८६ ग्रॅम वजनाचा गांजा आढळला. कुंभार याच्याकडे एक लाख ३४ हजार रुपयांचा पाच किलो ३६४ ग्रॅम वजनाचा गांजा सापडला. पोलिसांनी एकूण तीन लाख ८६ हजार २५० रुपयांचा हा गांजा जप्त केला.

    लक्ष्मण याने त्याच्याजवळील गांजा विकास व शिवाजी यांच्याकडून विकत घेतला होता, तर विकास व शिवाजी याने विशाखापट्टणम येथील चौथ्या साथीदाराकडून तो विकत घेतल्याचे कबूल केले. पोलिसांनी तिन्ही आरोपींकडून एकूण चार लाख एक हजार २५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. म्हाळुंगे एमआयडीसी पोलिस तपास करीत आहेत.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed