• Thu. Nov 28th, 2024
    पुणे जिल्ह्यात ‘शासन आपल्या दारी’अभियान; नागरिकांना घेतला सरकारी सेवा योजनांचा लाभ

    म. टा. प्रतिनिधी, पुणे : विविध प्रकारच्या सरकारी सेवा योजनांचा लाभ सामान्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी पुणे जिल्ह्यात मंगळवारी ‘शासन आपल्या दारी’ हे अभियान राबविण्यात आले. त्या अभियानांतर्गत एका दिवसात जिल्ह्यातील एक लाख ८१ हजार ३७६ नागरिकांना सरकारच्या विविध सेवा व योजनांचा लाभ मिळाला.या अभियानांतर्गत सुमारे ७५ हजार नागरिकांना योजनांचे लाभ देण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते. जिल्हाधिकारी डॉ. देशमुख आणि निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती कदम यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व उपविभागीय अधिकारी आणि तहसिलदारांनी शिबिराचे नियोजन केले होते. जिल्हाधिकाऱ्यांनी विविध सरकारी यंत्रणांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संवाद साधून नागरिकांना सेवा देण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्या दृष्टीने यंत्रणांनी विविध योजनांचा लाभ देण्यासाठी नागरिकांनाकडून अर्जही भरून घेतले.

    काही ठिकाणी सभागृहात, तर काही ठिकाणी मंडप उभारून विविध यंत्रणांचा कक्ष स्थापन करण्यात आला होता. शिबिरात महसूल, कृषी, आरोग्य, जलसंपदा, पशुसंवर्धन, पंचायत समिती, निवडणूक शाखा, भूमी अभिलेख, सामाजिक वनीकरण आदी विभागांनी सहभाग घेतला होता.

    शिबिराच्या माध्यमातून नागरिकांचे कष्ट वाचले आणि त्यांना योजनांचा लाभ मिळाला याचे समाधान जास्त आहे. सर्व अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांनी चांगले प्रयत्न केले. यापुढेही अशाच मोहिमा राबवून सरकारी योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी प्रयत्न केला जाईल.

    – डॉ. राजेश देशमुख, जिल्हाधिकारी

    हवेली, शिरुर, भोरमध्ये सर्वाधिक लाभ

    ठिकाण लाभार्थी

    पुणे शहर १० हजार ९२९

    हवेली २७ हजार ४१९

    मुळशी तीन हजार ९५०

    भोर २८ हजार ४४२

    मावळ तीन हजार ६८

    वेल्हे आठ हजार ३९०

    जुन्नर तीन हजार ५२३

    खेड १० हजार ८३७

    आंबेगाव २४ हजार २०३

    शिरुर ३३ हजार २२३

    बारामती २१ हजार ४३१

    पुरंदर पाच हजार ५१७

    अपर तहसील कार्यालय पिंपरी चिंचवड ४४२

    हवेली, शिरुर, भोरमध्ये सर्वाधिक लाभ

    पुणे शहरात १० हजार ९२९, हवेली २७ हजार ४१९, मुळशी तीन हजार ९५०, भोर २८ हजार ४४२, मावळ तीन हजार ६८, वेल्हे आठ हजार ३९०, जुन्नर तीन हजार ५२३, खेड १० हजार ८३७, आंबेगाव २४ हजार २०३ शिरुर ३३ हजार २२३, बारामती २१ हजार ४३१, पुरंदर पाच हजार ५१७ आणि अपर तहसील कार्यालय पिंपरी चिंचवड येथे ४४२ लाभार्थ्यांना शिबिराचा लाभ झाल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed