खुनाच्या घटनेचे प्रत्यक्षदर्शी साक्षीदार विनय वाघ व शुभम डंख यांनी, खून किती क्रूर व निर्दयी पद्धतीने केला, याबाबत साक्ष दिली. जायभाय याने वरील प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांनाही जीवे मारण्याचा प्रयत्न केला, हे अॅड. निकम यांनी पुराव्यानिशी सिद्ध केले. या प्रकरणी अॅड. निकम यांना जिल्हा सरकारी वकील अॅड. अविनाश देशपांडे, पोलिस आयुक्तालयातील विधी अधिकारी अॅड. सिद्धार्थ वाघ यांनी विशेष सहकार्य केले. आरोपीच्या वतीने अॅड. राजेश काळे, आरोपी विजय जौक याच्या वतीने अॅड. बी. एस. भाले, तर आरोपी संकेत मचे व उमर पटेल यांच्या वतीने अॅड. घाणेकर यांनी काम पाहिले.
बचाव पक्षाचा युक्तिवाद
– फिर्यादी विनय वाघ यांनी प्रथम दाखल केलेल्या फिर्यादीमध्ये उमर पटेल व संकेत मचे यांचा उल्लेख नव्हता. दहा दिवसांनी घेतलेल्या पुरवणी जबाबात त्यांना गोवण्यात आले. – विनय वाघ यांचा पुरवणी जवाब घेतल्यादिवशी आरोपीचे कपडे व गाडी जप्त करण्यात आली. त्याबाबतची नोंद स्पेशल डायरीला दहा दिवसांच्या नंतरची आहे. त्यामुळे उमर व संकेत मचे हे जायभाय याच्या गाडीत नव्हते हे दिसते.
– घटनेआधी किंवा नंतरही उमर व मचे जायभायच्या संपर्कात नव्हते. ते कटात सामील नसल्याने त्यांचा संकेतला जीवे मारण्याचा हेतू नव्हता.
– आरोपीने गाडी मागे घेतल्यानंतर गाडीच्या धडकेने मचे याचा पाय फ्रॅक्चर झाला. त्याला उमर व विजय जौक गाडे हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले. मोबाइल लोकेशनद्वारेही उमर व संकेत मंचे यांना अनुकूल आहेत.
सरकारी पक्षाचा युक्तिवाद
-संकेत कुलकर्णीचा खून करण्याचाच संकेत जायभाय याचा उद्देश होता.
– जायभाय याचा संकेत कुलकर्णीवर राग होता.
– त्याने ही बाब मैत्रिणीलाही बोलून दाखवली होती.
– घटना घडल्यानंतरही त्याने फोन करून आपण संकेतला कसे मारले याविषयी माहिती दिली होती.
– आपणच हा खून केल्याचा न्यायबाह्य कबुलीजबाबही (एक्स्ट्रा ज्युडिशियल कन्फेक्शन) दिला होता.