सोलापूर: दक्षिण सोलापूर तालुक्यातील लवंगी गावावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. गावातील राघवेंद्र सुभाष कांबळे (वय २५ वर्ष), जानू राघवेंद्र कांबळे (वय २३ वर्षे), राकेश राघवेंद्र कांबळे (वय ५ वर्षं), रश्मीका राघवेंद्र कांबळे (वय २ वर्ष) या चौघांचा कर्नाटकातील होस्पेट या ठिकाणी अपघातात मृत्यू झाला. राघवेंद्र कांबळे हा गेल्या अनेक वर्षांपासून बंगळुरू शहरात एका कंपनीत नोकरी करत होता. लवंगी गावातील यलम्मा देवीची यात्रा असते. त्यानिमित्ताने राघवेंद्र आपल्या मूळ गावी पत्नी व दोन मुलांना घेऊन आला होता. यलम्मा देवीची यात्रा संपन्न झाल्यानंतर राघवेंद्र व त्याच्या परिवार दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्याबरोबर लवंगी गावातील ग्रामस्थांवर देखील दुःखाचा डोंगर कोसळला आहे.सोमवारी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास चार मृतदेह पाहून गावातील प्रत्येक ग्रामस्थाच्या डोळ्यात पाणी आले होते. राघवेंद्र याचे आई वडील शेतमजूर असून मिळेल ते काम करतात. एकुलता एक मुलगा व व त्याचा संपूर्ण परिवार नाहीसा झाल्याने वृद्ध आई वडिलांची दातखिळी बसली आहे.
चार मृतदेह गावात आल्याने लवंगीत आज चूल पेटली नाही
राघवेंद्र कांबळे, त्याची पत्नी दोन चिमुकल्याचे मृतदेह सोमवारी सकाळी दक्षिण सोलापूर तालुक्यातील लवंगी गावात पोहोचले. अपघाताची माहिती मिळताच गावावर शोककळा पसरली होती. लवंगीतील ग्रामस्थांनी रात्र जागून काढली. सोमवारी सकाळी २९ मे रोजी ८ वाजण्याच्या सुमारास चार मृतदेह गावात दाखल झाले. चारही मृतदेहांना पाहून प्रत्येक ग्रामस्थ रडत होता. तासाभरात मृतदेहांवर अंतिम संस्कार करण्यात आले. सोमवारी दिवसभर लवंगीत शोकाकूल वातावरण होते. एका ग्रामस्थाने दिलेल्या माहितीनुसार लवंगीत काल रात्रीपासून चूल पेटली नाही.

कांबळे परिवाराचा वंश संपला
अपघातात मयत झालेल्या राघवेंद्र कांबळेचे आई वडील हे शेतमजूर आहेत. सुभाष कांबळे यांना राघवेंद्र एकुलता एक मुलगा होता. १२ वी पर्यतचे शिक्षण घेऊन तो बंगळुरू शहरात एका खाजगी कंपनीत नोकरी करत होता. नोकरीच्या जोरावर सहा वर्षांपूर्वी त्याचे लग्न झाले होते. काही दिवसांपूर्वी राघवेंद्रने इंडिका कार विकत घेतली होती.
स्वतःची इंडिका कार घेऊन तो पत्नी व दोन मुलांना घेऊन सोलापूरच्या यल्लम्मा देवीच्या यात्रेला आला होता. राघवेंद्रला एक मुलगा व एक मुलगी, पत्नी असा परिवार होता. यलम्मादेवीची यात्रा संपवून तो इंडिका कार घेऊन निघाला असता काळाने घाला घातला. संपूर्ण परिवार संपला. कांबळे परिवाराचा वंश संपला अशी चर्चा करत ग्रामस्थ दुःख व्यक्त करत होते.