दरम्यान, सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार उद्या (मंगळवारी) सकाळी १० वाजता समीर वानखेडे यांचे वडील ज्ञानदेव वानखेडे आणि त्यांची बहीण दोघेही सीबीआय कार्यालयात सीबीआय चौकशीसाठी जाणार आहेत. ज्या सीबीआयच्या पथकाने समीर वानखेडे यांची चौकशी केले तेच पथक उद्या समीर वानखेडे यांची बहीण आणि वडिलांचीही चौकशी करणार आहे.
माझ्या जीवाला धोका, वानखेडेंचं पोलीस आयुक्तांना पत्र
भ्रष्टाचार आणि खंडणीचा गुन्हा दाखल झाल्यामुळे अडचणीत आलेले ‘एनसीबी’चे तत्कालीन विभागीय संचालक समीर वानखेडे यांनी आपल्या जीवाला धोका असल्याची भीती व्यक्त केली आहे. अतिक अहमदप्रमाणे माझे बरेवाईट केले जाऊ शकते असे सांगतानाच त्यांनी मुंबईचे पोलिस आयुक्त फणसळकर यांना त्यांनी पत्र लिहिले आहे. या पत्रातून त्यांनी विशेष पोलिस संरक्षण देण्याची मागणी केली आहे.
वानखेडेंनी अनेक नियमांचं उल्लंघन केलंय, चौकशी समितीत दोषी आढळले!
समीर वानखेडे यांच्या चौकशीसाठी स्थापन झालेल्या विशेष चौकशी पथकाला (एसईटी) त्यांनी अनेक सेवा नियमांचे उल्लंघन केल्याचे आढळले. यामध्ये परदेशी प्रवासाच्या खर्च आणि महागड्या घडाळ्यांचा व्यवहारांची चुकीची माहिती देण्याच्या कृत्यांचा समावेश आहे.
केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) एसईटीने नोंदवलेल्या या निष्कर्षांची नोंद घेतली आहे. एसईटीने गेल्या वर्षी केंद्रीय प्रशासकीय लवादाकडे (कॅट) आपला अहवाल सादर केला. क्रूझवरील अमली पदार्थांबाबत टाकलेल्या छाप्याच्या प्रक्रियेत अनियमितता आणि केंद्रीय नागरी सेवा (सीसीएस) नियमांचे उल्लंघन अशा दोन मुख्य अनियमितता एसईटीला समीर वानखेडे आणि त्यांच्या टीमविरोधात आढळल्या.