• Sat. Sep 21st, 2024
वैजापूर तालुक्यात गुलाबी वादळ; ‘बीआरए’चे पहिले संपर्क कार्यालय पालखेड्यामध्ये

First BRS Liaison Office : तेलंगणा राज्यातील भारत राष्ट्र समिती अर्थात बीआरएस या पक्षाचे जिल्ह्यातील पहिले संपर्क कार्यालय वैजापूर तालुक्यातील पालखेड येथे शनिवारी सुरू करण्यात आले..

 

brs party
वैजापूर तालुक्यात गुलाबी वादळ; ‘बीआरए’चे पहिले संपर्क कार्यालय पालखेड्यामध्ये
म. टा. प्रतिनिधी, वैजापूर : तेलंगणा राज्यातील भारत राष्ट्र समिती अर्थात बीआरएस या पक्षाचे जिल्ह्यातील पहिले संपर्क कार्यालय वैजापूर तालुक्यातील पालखेड येथे शनिवारी सुरू करण्यात आले. राष्ट्रीय अध्यक्ष व तेलंगणचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांच्या मार्गदर्शनाखाली माजी जिल्हा परिषद सदस्य व राष्ट्रवादीचे नेते अभय पाटील चिकटगावकर यांनी काही महिन्यापूर्वी पक्षात जाहीर प्रवेश केला होता. त्यानंतर या पक्षाची तालुक्यात व जिल्ह्यात ताकद वाढवण्यासाठी अभय चिकटगावकर यांनी पुढाकार घेतला असून, तालुक्यासह जिल्ह्यात सर्वत्र संपर्क कार्यालय स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचाच एक भाग म्हणून वैजापूर तालुक्यातील पहिले संपर्क कार्यालय पालखेड येथे स्थापन करण्यात आले. येथील पारेश्वर मंदिरात पारेश्वराचे दर्शन घेऊन पक्षबांधणीचा संकल्प करण्यात आला. गावातील महापुरुषांच्या स्मारकास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. पालखेड येथे प्रवीण भाडाईत यांनी पहिले संपर्क कार्यालय सुरू करून पक्ष वाढीसाठी महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे.
Pune Loksabha: ज्याची ताकद जास्त त्याला पुण्यात उमेदवारी मिळावी; अजित पवारांचं महत्त्वपूर्ण वक्तव्य
आगामी काळात जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत फक्त गुलाबी झेंडा फडकवणारच असा विश्वास या वेळी अभय चिकटगावकर यांनी व्यक्त केला. ऑनलाइन सदस्य नोंदणी करून प्रत्येक गावात शाश्वत यंत्रणा उभी करू, असे त्यांनी सांगितले. या वेळी ‘बीआरएस’चे चंद्रशेखर साळुंखे, भास्कर मतसागर प्रभाकर कोकाटे, नवनाथ पवार, अबू पठाण, संदीप गाजरे, अरुण शेळके, दीपक लाड, अशोक भाडाईत, सोन्याबापू मराठे, बाळू शेळके, सोमनाथ रोठे, पारसनाथ डमाळे, रामकृष्ण रोठे, तुकाराम पवार, मंगल शेलार, रमेश त्रिभुवन, कारभारी त्रिभुवन आदी उपस्थित होते.

तेलंगणा राज्यातील भारत राष्ट्र समिती अर्थात बीआरएस या पक्षाचे जिल्ह्यातील पहिले संपर्क कार्यालय वैजापूर तालुक्यातील पालखेड येथे शनिवारी सुरू करण्यात आले.

जवळच्या शहरातील बातम्या

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed