ठाणे : मुंब्रा येथील रेतीबंदर परिसरात एका महिलेचा मृतदेह कपड्यात गुंडाळून सेलो टेप ने पॅक केल्याची खळबजनक घटना समोर आली आहे. सदर महिलेचा आढळलेला मृतदेह पाहून या महिलेची हत्या झाली असावी असा अंदाज पोलिसांनी वर्तवली आहे.मुंब्रा येथील रेतीरेतीबंदर परिसरात महिलेचा कपड्यात आढळलेला मृतदेह हा दोन ते तीन दिवस जुना असल्याचे सांगण्यात येत आहे. त्या महिलेची हत्या केल्यानंतर तिला कपड्यात गुंडाळून त्याला सेलोटेप गुंडाळून कोणालाही संशय येऊ नये असा पॅक करण्यात आला होता. आतापर्यंत मृत महिलेची ओळख पटलेली नाही. स्थानिक लोकांना प्रथम कचरा असल्याचे समजले.
मात्र त्यातून दुर्गंध आल्यानंतर पोलिसांना पाचारण करण्यात आले. पोलिसांना घटनास्थळी घेऊन पाहणी केली असता त्या कपड्यात एका महिलेचा मृतदेह आढळून आला. या मृत महिलेचे वय अंदाजे २० ते ५ वर्षे असल्याचे सांगण्यात येत आहे. मृतदेह सापडलेल्या ठिकाणी फॉरेन्सिक टीमलाही पाचारण करण्यात आले. प्रकरणाचा पुढील तपास मुंब्रा पोलीस करत आहेत.

सध्या महिलेचा मृतदेह आढळून आल्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. मात्र या महिलेचा मृतदेह मिळाल्यामुळे पोलिसांनी या महिलेची ओळख पटवण्याचा कामाला सुरुवात केली आहे. या महिलेची कुठे मिसिंगची तक्रार आहे का? या प्रकरणी पोलीस तपास करत आहेत.
नक्की या महिलेसोबत काय घडले याचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी महिलेचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. शविच्छेदनानंतर आणि पोलीस तपासा नंतर या महिलेसोबत नक्की काय घडले हे उघड होणार आहे.