जरांगे पिता-पुत्रांचा काळीज पिळवटणारा व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय. पाटोदा शहरात मध्यरात्री घडलेला एक प्रसंग सर्वांनाच भावुक करणारा ठरला. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे हे मुंबईच्या दिशेने निघाले आहेत. मंगळवारी रात्री उशिरा जरांगे पाटोद्यात दाखल झाले. मध्यरात्रीच्या २ वाजताही जरांगेंसाठी मराठा समाजबांधव मोठ्या संख्येने स्वागताला उपस्थित होते. या गर्दीतही सर्वांचंच लक्ष वेधून घेतलं ते या एका भावनिक भेटीने. जरांगेंची प्रकृती नाजूक असल्याने सर्व समाज चिंतेत आहे. तर लेकाची गंभीर अवस्था पाहून जरांगेंचे वडिलही हळहळले. पहाटे तीन वाजता जरांगेंचे वडिल त्यांना भेटण्यासाठी म्हणून आले. गेल्या 18 दिवसांपासून उपोषण सुरू असल्याने जरांगेंना पाहून त्यांचे वडिल भावुक झाले.