• Sat. Sep 21st, 2024

शिक्षण, शेतमजुरी करत तरुणीची उंच भरारी, विडी कामगाराच्या लेकीची मुंबई पोलीस दलात भरती

शिक्षण, शेतमजुरी करत तरुणीची उंच भरारी, विडी कामगाराच्या लेकीची मुंबई पोलीस दलात भरती

नाशिक : परिस्थितीवर मात करून अनेकजण यशस्वी झाल्याची उदाहरणं आपण समाजात पाहिली आहेत. असंच एक उदाहरण नाशिक जिल्ह्यात पाहायला मिळालं आहे. पोलीस होण्याचं ध्येय डोळ्यासमोर ठेवत प्रचंड मेहनत आणि चिकाटी अंगाशी बाळगून विडी कामगार असलेल्या आईची मुलगी मुंबई पोलीस दलात दाखल झाली आहे.विडी कामगार असलेल्या आईची मुलगी प्रतिमा यादव मुंबई पोलीस दलात भरती झाल्याने कुटुंबात आनंदाचं वातावरण पसरलं आहे. प्रतिमाचं सर्वच स्तरातून कौतुक होत आहे. प्रतिमाच्या जिद्द आणि मेहनतीने तिला यशाच्या शिखरापर्यंत पोहोचवलं आहे. घरची बिकट परिस्थिती असताना प्रतिमाने मुंबई पोलीस दलात दाखल होत स्वतःसह कुटुंबाची प्रतिमा उंचावली आहे.

Success Story : संसाराचा गाडा सांभाळला, नोकरी करत अभ्यास केला, कोल्हापूरच्या लेकीची MPSC परीक्षेत हॅट्रिक
सिन्नरच्या पूर्व भागातील निर्‍हाळे येथील साबळे – वाघिरे (संभाजी विडी) या विडी कारखान्यात काम करणारी आई मीना यादव आणि फोटोग्राफर असलेले वडील संतोष यादव यांची ज्येष्ठ कन्या प्रतिमा यादव ही लहानपणापासूनच मेहनती होती. आईला घरकामापासून ते विड्या वळण्याच्या कामापर्यंत हातभार लावत कधी कधी आईबरोबर शेतमजुरी करण्यासाठी देखील जात होती. लहानपणापासून असलेल्या मेहनतीची सवय ही पोलीस दलात भरती होण्यासाठी देखील उपयोगी ठरली आहे.

ना क्लास, ना कोणती अकॅडमी घरीच केला अभ्यास; तरुणीनं 560 वा क्रमांक मिळवत स्वप्न सत्यात उतरवलं

आई मीना या विड्या वळून मिळणार्‍या पगारातून कुटुंबाचा उदरनिर्वाह आणि प्रतिमाच्या शिक्षणाचा खर्च करत होती. त्यातूनच तिचं शिक्षण दहावीपर्यंत निर्‍हाळे माध्यमिक विद्यालयात झालं. वडील संतोष यादव यांनी सिन्नर येथील एका प्रशिक्षण संस्थेत तिचा प्रवेश घेतला आणि कॉलेजही सुरू ठेवलं. घरातील काम, शिक्षण आणि पोलीस भरतीसाठीची मेहनत अशी भूमिका पार पाडत तिने अखेर पोलीस दलात भरती होत मोठं यश मिळवलं आहे.

घरात ज्येष्ठ मुलगी असलेली प्रतिमा यादव मुंबई पोलीस दलात दाखल झाल्याने कुटुंबात मोठा उत्साह आहे. प्रतिमाची मेहनत, कुटुंबाचे संस्कार आणि शिक्षकांनी दिलेलं पाठबळ तिच्यासाठी लाख मोलाचं ठरलं आहे. तर कुटुंबातील आजी, आई-वडील, काका सोमेश्वर, चुलते गणेश आणि शिक्षक प्रशिक्षकांचे सहकार्य मिळाल्याची भावना प्रतिमाने व्यक्त केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed