खोल असलेल्या आणि पाण्याने भरलेल्या विहिरीत उतरण्याची कोणतीच सोय नव्हती. यामुळे मृतदेह बाहेर कसा काढायचा? हा प्रश्न निर्माण झाला होता. मग मोठ्या संख्येने गावकरी विहिरीजवळ जमले. मृतदेह काढण्यासाठी खटाटोप सुरू होता. पण या ठिकाणी शेतकऱ्याच्या मृतदेहावर एक नाग फणा काढून बसल्याची बाब समोर आली. आणि हे बघून सर्वांची गाळण उडाली.
पाण्याच्या शोधात नाग देखील विहिरीमध्ये पडला असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला. पण आता पाण्यात तरंगत असणारा मृतदेह काढण्यासाठी विहिरीमध्ये कोण उतरणार? हा प्रश्न निर्माण झाला होता. कारण पाण्यात पडलेला नाग हा आपला जीव वाचवण्यासाठी मृत शेतकऱ्याच्या अंगावर बसून होता. त्यामुळे विहिरीमध्ये उतरण्याची कोणाची हिंमत होत नव्हती.
विहिरीतून असा काढला मृतदेह बाहेर
अखेर सर्पमित्र असणाऱ्या रोहन शेलार आणि मोहसिन शेख यांना गावकऱ्यांनी पाचारण केले. यानंतर सर्प मित्रांनी नागाला बाहेर काढण्यासाठी रेस्क्यू ऑपरेशन सुरू केले. अत्यंत धाडसाने हे सर्प मित्रांनी विहिरीत उतरले. त्यानंतर मृतदेहाच्या अंगावर फणा काढून बसलेल्या नागाला अलगदपणे उचलून घेतलं. आणि त्यानंतर त्याला पकडून विहिरीच्या बाहेर काढत नैसर्गिक अधिवासात सोडून दिले.
जत तालुक्यातील जिरग्याळ येथे दोन आठवड्यापूर्वी ही घटना घडली. याघटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. नागाला विहिरीतून रेस्क्यू ऑपरेशन करतानाचा व्हिडिओ खूप बघितला जात आहे.