• Wed. Mar 11th, 2026

    लग्नात पाहिलं अन् एकमेकांवर भाळले, लॉजवर भेटताच प्रेमभंग; पुण्याच्या तरुणीसोबत शेगावात घडलं भयंकर

    लग्नात पाहिलं अन् एकमेकांवर भाळले, लॉजवर भेटताच प्रेमभंग; पुण्याच्या तरुणीसोबत शेगावात घडलं भयंकर

    बुलडाणा : प्रेमाच्या नावाखाली तरुण-तरुणी चुकीच्या मार्गाचा अवलंब करू लागले आहेत. यातून अनेकजण गुन्हेगारीच्या मार्गावर येत आहेत. अशात पुण्याच्या भोसरी भागात राहणाऱ्या २२ वर्षीय तरुणीवर शेगावात असाच चुकीचा प्रसंग ओढवला आहे. प्रियकराने तिला शेगावातील एका लॉजवर नेऊन बळजबरीने तिचे शारीरिक शोषण केले. या घटनेमुळे सध्या संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून पोलीस तपास सुरू असल्याची माहिती आहे.मिळालेल्या माहितीनुसार, पीडित २२ वर्षीय तरुणी वर्षभराआधी छत्रपती संभाजीनगरात एका लग्नासाठी आली होती. त्याच लग्नात बुलडाणा जिल्ह्यातल्या मलकापूर तालुक्यातील हरणखेडचा सिद्धांत मुरलीधर खाचणे (२८) हा सुद्धा होता. यावेळी तरुणीची सिद्धांतसोबत ओळख झाली. हळूहळू दोघांचे फोनवर बोलणे वाढले आणि दोघांमध्ये प्रेम जुळलं. दोघांच्या भेटीगाठी वाढल्या. सिद्धांतने त्याच्या मोबाईलमध्ये तिचे अनेक फोटो काढले.

    Monsoon Updates: IMD ने मान्सूनबाबत दिली गुड न्यूज, एल निनोचा धोका असतानाही असा बरसणार पाऊस
    दरम्यान, काही दिवसांआधी सिद्धांतने तिच्यासोबत लग्न करण्याचा तगादा लावला. आपण प्रेमविवाह करू असे सिद्धांत तिला म्हणत होता. मात्र, तिचा लग्नाला नकार होता. काही दिवसांआधी तरुणीला सिद्धांत याने खामगावला बोलावले. तिथून जबरदस्तीने मोटारसायकलवर बसून शेगावला नेले. तिथे एका लॉजवर तरुणीसोबत जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले. इतकंच नाहीतर तरुणीचे नको त्या अवस्थेतील फोटो काढले आणि ते सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी दिली.

    तरुणी कशीबशी त्याच्या तावडीतून सुटून भोसरी येथे गेली. तिथल्या पोलीस ठाण्यात जाऊन तिने आपबिती कथन केली. यानंतर पोलिसांनी सिद्धांत विरुद्ध गुन्हा दाखल केला. घटनास्थळ शेगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीत असल्याने प्रकरण शेगाव पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले असून पुढील तपास सुरू असल्याची माहिती आहे.

    मुंबईतल्या प्रत्येक स्त्रीसाठी महत्त्वाची बातमी, तुम्ही किती सुरक्षित आहात? पोलिसांचा अहवाल वाचून हादराल

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed