• Fri. Nov 29th, 2024

    कडाक्याच्या उन्हाळ्यात एसी लोकलचा गारवा, प्रवासी संख्येत २२८ टक्क्यांनी वाढ, रेल्वे मालामाल

    कडाक्याच्या उन्हाळ्यात एसी लोकलचा गारवा, प्रवासी संख्येत २२८ टक्क्यांनी वाढ, रेल्वे मालामाल

    मुंबई: वाढत्या उन्हाच्या झळा असह्य होत असल्याने रेल्वे प्रवाशांचा वातानुकूलित रेल्वे प्रवासाला पसंती मिळालेली आहे. मे महिन्याच्या अवघ्या २४ दिवसांत रोज सरासरी ५८ हजार प्रवाशांनी एसी लोकल प्रवासाला प्राधान्य दिले आहे. यंदाच्या पाच महिन्यांत मध्य रेल्वेच्या एसी लोकलमधून ७१.३३ लाख प्रवाशांनी केला आहे. गेल्यावर्षी मे महिन्याच्या तुलनेत यंदा मे महिन्याच्या एसी लोकल प्रवासी संख्येत २२८ टक्यांनी वाढ झालेली आहे. एसी लोकलला प्रतिसाद उदंड असला तरी मर्यादित फेऱ्यांमुळे मोठा प्रवासीवर्ग एसी लोकलच्या प्रवासापासून दुरावला आहे.१ जानेवारी ते २४ मे २०२३

    एसी लोकल प्रवासी संख्या – ७१.३३ लाख

    एसी लोकल उत्पन्न – ३२.२२ कोटी

    लग्नाला ५ दिवस असताना बेपत्ता झाली, मग पाण्याच्या पाइपमध्ये अर्धवट मृतदेह; पोलिसांसमोर विचित्र ‘Death Mystery’
    प्रवासी वाढले

    – १ मे ते २४ मे २०२२

    एसी लोकल प्रवासी संख्या – ६.१७ लाख

    – १ मे ते २४ मे २०२३

    एसी लोकल प्रवासी संख्या – १४.१३ लाख

    – प्रवासी वाढ – २२८ टक्के

    उत्पन्न वाढले

    – १ मे ते २४ मे २०२२

    एसी लोकल प्रवासी उत्पन्न – २.८३ कोटी

    – १ मे ते २४ मे २०२३

    एसी लोकल प्रवासी उत्पन्न – ६.६६ कोटी

    – उत्पन्न वाढ – २३४ टक्के

    करोनात पतीला गमावलं, दोन वर्षांनंतरही पत्नीचं प्रेम कमी झालं नाही, कबर खोदून अवशेष बाहेर काढले अन्…
    महिना – प्रवासी संख्या (लाखांमध्ये ) – उत्पन्न

    जानेवारी – १३.४९ – ५.८१

    फेब्रुवारी – १३.५० – ५.९४

    मार्च – १५.१८ – ६.७३

    एप्रिल – १५.०४ – ७.०८

    २४ मेपर्यंत – १४.१३ – ६.६६

    * मे महिना (अंदाजित ) – १६ – ७.५० (अंदाजित)

    महिना – रोजचे सरसरी प्रवासी

    जानेवारी – ४३,५३०

    फेब्रुवारी – ४८,२२५

    मार्च – ४८,९८९

    एप्रिल – ५०,१०३

    २४ मे पर्यंत – ५८,८८०

    *संपूर्ण मे महिना – ६०,००० (अंदाजित)

    एसी लोकलचा स्वयंचलित दरवाजा गेल्या १० दिवसांपासून बंद; महिला प्रवाशानं थेट डब्यातूनच व्हिडीओ केला व्हायरल

    मध्य रेल्वेवरील एसी लोकल

    – मुंबई विभागात ४ वातानुकूलित रेल्वे गाड्या आहेत.

    – रोज ५६ एसी फेऱ्या धावतात.

    – रविवार आणि सुट्टीच्या दिवशी १४ लोकल फेऱ्या धावतात.

    – एसी लोकलची देखभाल दुरुस्ती कुर्ला कारशेड येथे होते.

    – दरवाजे बंद असल्याने धावत्या लोकलमधून पडून होणारे अपघातावर पूर्णपणे नियंत्रण

    – सीसीटीव्ही, टॉकबॅक यंत्रणा, प्रवासी माहिती यंत्रणा यांचा समावेश यात आहे.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed