• Sat. Sep 21st, 2024

बोगस सिमकार्डप्रकरणी दोघा विक्रेत्यांवर गुन्हा दाखल; मिरा-भाईंदरमध्ये कारवाई

बोगस सिमकार्डप्रकरणी दोघा विक्रेत्यांवर गुन्हा दाखल; मिरा-भाईंदरमध्ये कारवाई

Mira-Bhyander News : बोगस सिमकार्डप्रकरणी दोन विक्रेत्यांवर मिरा-भाईंदरमध्ये कारवाई करण्यात आली आहे.

 

fake sim card
बोगस सिमकार्डप्रकरणी दोघा विक्रेत्यांवर गुन्हा दाखल
म. टा. वृत्तसेवा, मिरा-भाईंदर : एकाच व्यक्तीच्या बनावट कागदपत्रांआधारे अनेक मोबाइल सिमकार्ड सुरू करण्यात आल्याच्या प्रकरणात, मिरा-भाईंदरमध्ये दोघा सिमकार्ड विक्रेत्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. केंद्र सरकारच्या दूरसंचार विभागाच्या आदेशानुसार, मिरा-भाईंदर वसई-विरार पोलिसांच्या सायबर शाखेने ही कारवाई केली आहे.मुंबई व लगतच्या शहरात एकाच व्यक्तीचे फोटो व इतर बोगस कागदपत्रे वापरून अनेक सिमकार्ड सुरू करण्यात आल्याची बाब केंद्रीय दूरसंचार विभागाच्या निदर्शनास आली होती. त्यानुसार त्यांनी माहिती देत, मिरा-भाईंदर वसई-विरार पोलिस आयुक्तालयाला पडताळणी करून कारवाई करण्याचे आदेश दिले होते. अधिक तपास करताना, पोलिसांच्या सायबर शाखेला भाईंदरमधील एटीसी व ओम मोबाइल या दोन सिमकार्ड विक्रेत्यांनी एकाच व्यक्तीच्या नावावर बोगस कागदपत्रांआधारे मागील वर्षभरात १४४ सिमकार्ड बेकायदा पद्धतीने सुरू केल्याचे समोर आले होते.
शिपिंगमध्ये नोकरीचे स्वप्न बघताय? पण अशी चूक कराल तर मग झालंच, नवी मुंबईत लाखोंची फसवणूक उघड
या प्रकरणाची सायबर गुन्हे शाखेने भाईंदरच्या नवघर पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती. त्यावरून नवघर पोलिसांनी दोन्ही सिमकार्डविक्रेत्यांविरोधात विविध कलमांतर्गत नुकताच गुन्हा दाखल केला आहे.

जवळच्या शहरातील बातम्या

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed