• Mon. Nov 25th, 2024
    राज्यात खळबळ उडवून देणारं एमपीएससी हॅकिंग प्रकरण, नवी मुंबई पोलिसांची कारवाई, तरुणाला अटक

    म. टा. वृत्तसेवा, नवी मुंबई : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) वेबसाइटवर टाकण्यात आलेली संयुक्त पूर्व परीक्षेची तब्बल ९४,१९५ हॉल तिकिटे बेकायदेशीररित्या डाऊनलोड करून ही हॉल तिकिटे ‘टेलिग्राम’वर बेकायदेशीररीत्या प्रसारित करणाऱ्या रोहित दत्तात्रय कांबळे (वय १९) या तरुणाला नवी मुंबई पोलिसांच्या सायबर सेलने पुणे येथून अटक केली आहे. रोहित कांबळे हा डार्कनेटवरील काही हॅकर्सच्या संपर्कात असल्याचे आढळून आले आहे.

    महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने गट ‘ब’ आणि गट ‘क’च्या संयुक्त पूर्व परीक्षेच्या उमेदवारांची हॉल तिकिटे २८ एप्रिलला आपल्या वेबसाइटवर टाकली होती. ही हॉल तिकिटे उमेदवारांच्या सोयीसाठी बाह्य लिंकद्वारे आयोगाच्या वेबसाइटवर टाकण्यात आली होती. मात्र, याच गोष्टीचा फायदा घेत अज्ञात हॅकरने आयोगाने वेबसाइटवर टाकलेल्या बाह्य लिंकमध्ये बेकायदेशीररित्या प्रवेश करून त्यातील माहिती अवैधरित्या प्राप्त करून त्याद्वारे वेबसाइटवरील तब्बल ९४,१९५ उमेदवारांची हॉल तिकिटे डाऊनलोड केली होती. त्यानंतर हॅकरने आयोगाच्या वेबसाइटवरून डाऊनलोड केलेला उमेदवारांच्या हॉल तिकिटांचा डाटा ‘एमपीएससी २०२३ ए’ या ‘टेलिग्राम’च्या चॅनलवर बेकायदेशीरीत्या प्रसारित केला होता.

    या प्रकारानंतर एमपीएससीच्या उमेदवारांमध्ये गोंधळाचे वातावरण पसरले होते. त्यानंतर आयोगाचे सहसचिव सुनील अवताडे यांनी नवी मुंबई पोलिसांच्या सायबर सेलकडे याबाबत तक्रार दाखल केल्यानंतर नवी मुंबई पोलिसांच्या सायबर सेलने या संपूर्ण प्रकरणाच्या तपासाला सुरुवात केली होती. या तपासात सायबर सेलंचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक विजय वाघमारे व त्यांच्या पथकाने या प्रकरणाचा सखोल तांत्रिक तपास करून अज्ञात हॅकरने गुन्हा करताना वापरलेला आयपी अॅड्रेस मिळवून तांत्रिक माहितीच्या आधारे संशयित आरोपी रोहित दत्तात्रय कांबळे याला पुण्यातील चिखली, पाटीलनगर येथून बुधवारी ताब्यात घेतले. यावेळी पोलिसांनी रोहित कांबळे याच्या घरातून गुन्ह्यात वापरलेला १ डेस्कटॉप, १ लॅपटॉप, ३ मोबाइल फोन व एक इंटरनेट राऊटर असे साहित्य जप्त केले आहे.
    अहिल्यादेवींच्या चौंडीत संघर्ष अटळ, गेल्यावर्षीचं उट्टं काढणार, राम शिंदे-रोहितदादा आमनेसामने
    पोलिसांनी केलेल्या चौकशीत रोहित कांबळेने त्याच्या साथीदारांसह हा गुन्हा केल्याची कबुली दिली आहे. त्यानुसार त्याला अटक करण्यात आल्याची माहिती पोलिस आयुक्त मिलिंद भारंबे यांनी दिली. रोहित कांबळेने डार्क नेटवरील साथीदारांच्या मदतीने अशाच प्रकारचे आणखी काही गुन्हे केले असण्याची शक्यता आहे. त्यानुसार त्याची कसून चौकशी करण्यात येत असल्याचे पोलिस आयुक्त भारंबे यांनी सांगितले. न्यायालयाने त्याला २७ मे पर्यंत पोलिस कोठडी ठोठवल्याचेही त्यांनी सांगितले.
    प्ले ऑफमध्ये कसं खेळायचं ते मुंबईकडून शिकावं, आता स्वप्न फक्त एकच, पाहा नेमकं कोणतं…

    हॅकिंगसाठी ४०० डॉलरची सुपारी

    पोलिसांनी केलेल्या चौकशीत रोहित कांबळे हा बीएससीच्या दुसऱ्या वर्षात शिकत असून, त्याने सायबर सेक्युरिटीचे विविध प्रकारचे कोर्सेस केल्याचे तपासात आढळून आले आहे. तसेच तो डार्क नेटवरील काही हॅकर्सच्या संपर्कात असल्याचे तपासात आढळून आले असून, डार्कनेटवरील हॅकर्सनी त्याला एमपीएससीच्या वेबसाइटवरून उमेदवारांचे हॉल तिकीट व एमपीएससी परीक्षेचे प्रश्नपत्रिका हॅक करण्यासाठी तब्बल ४०० डॉलरची सुपारी दिल्याचे तपासात आढळून आले आहे. त्यानुसार पोलिसाकडून पुढील तपास करण्यात येत आहे, अशी माहिती पोलिस आयुक्त मिलिंद भारंबे यांनी दिली.
    Mumbai News : मुंबईत दोन दिवस पाण्याचा मेगाब्लॉक, महापालिकेचा निर्णय, दोन दिवस पाणी पुरवठा कुठं बंद राहणार?

    घाईगडबडीत कर्ज हवं म्हणून अॅपवरून पैसे घेताय? थांबा ! लोन अॅप घोटाळा समजून घ्या

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed