हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाच्या शिर्डी ते भरवीर ता. इगतपुरी या दुसऱ्या टप्प्याचं लोकार्पण होणार आहे. हा मार्ग ८० किलोमीटर लांबीचा असून या मार्गावर ७ मोठे पूल, १८ छोटे पूल, वाहनांसाठी ३० भुयारी मार्ग, हलक्या वाहनांसाठी २३ भुयारी मार्ग, ३ पथकर प्लाझावरील तीन इंटरचेंज, ५६ टोल बूथ, ६ वे ब्रिज अशा सुविधांचा समावेश आहे. पॅकेज क्र ११, १२ आणि १३ चं इगतपुरी तालुक्यामधील भरवीर पर्यंतचं काम पूर्ण झालं आहे. प्रकल्पाच्या या दुसऱ्या टप्प्याचा खर्च ३२०० कोटी रुपये असून लांबी ८० किमी आहे. या टप्याच्या उद्घाटनानंतर ७०१ किमी पैकी आता एकूण ६०० किमी लांबीचा समृध्दी महामार्ग वाहतुकीस उपलब्ध होणार आहे.