• Sat. Sep 21st, 2024

CCTVबंद कर रे, सगळे एकमेकांच्या कानाखाली मारा; क्रिकेट टर्फमध्ये पोलीस अधिकाऱ्याकडून शिवीगाळ

CCTVबंद कर रे, सगळे एकमेकांच्या कानाखाली मारा; क्रिकेट टर्फमध्ये पोलीस अधिकाऱ्याकडून शिवीगाळ

अंबरनाथ: अंबरनाथमध्ये एका पोलीस अधिकाऱ्याने सीसीटीव्ही बंद करायला सांगत टर्फमध्ये क्रिकेट खेळत असलेल्या खेळाडूंना आणि टर्फच्या मॅनेजरला शिवीगाळ करत उठाबश्या काढायला लावल्याची घटना घडली आहे. ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली असून याप्रकरणी संबंधित अधिकाऱ्यावर कारवाई करण्याची मागणी टर्फ चालकाने केली आहे. तर वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी याप्रकरणी कानावर हात ठेवले आहेत.अंबरनाथच्या चिखलोली पाडा परिसरात अथेना टर्फ आहे. या टर्फमध्ये २० मे रोजी रात्री अडीच वाजताच्या सुमारास काही तरुण क्रिकेट खेळत होते. यावेळी रात्रगस्तीवर असलेले शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक सुहास पाटील हे तिथे आले आणि त्यांनी या खेळाडूंसह टर्फचे मॅनेजर केवल विकमानी यांना अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केली. यानंतर टर्फच्या मॅनेजरला सीसीटीव्ही बंद करायला सांगत सगळ्या खेळाडूंनी एकमेकांच्या कानाखाली मारा, असे सांगितले.

WTC फायनलच्या तोंडावर विराट कोहलीला दुखापत; एका कॅचने टीम इंडियाचे टेन्शन वाढवले, कोच म्हणाले…
इतक्यावरच न थांबता त्यांनी सर्व खेळाडू आणि टर्फचे मॅनेजर यांना प्रत्येकी २००-२०० उठाबश्या काढायला लावल्या. टर्फच्या मॅनेजरने सीसीटीव्ही बंद न केल्यानं हा सगळा प्रकार टर्फमध्ये लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेरात आवाजासहित कैद झाला. यानंतर टर्फ मॅनेजर केवल विकमानी यांना पोलीस ठाण्यात नेत त्यांच्यावर गुन्हाही दाखल करण्यात आला. या सगळ्या प्रकारानंतर केवल विकमानी यांनी आज हे सीसीटीव्ही फुटेज घेत माध्यमांकडे आपली व्यथा मांडली. सुहास पाटील हे नेहमीच आपल्याला त्रास देत असून खेळाडूंना शिव्या देण्याचा आणि शिक्षा देण्याचा अधिकार त्यांना कुणी दिला? असा सवाल यानंतर टर्फ मॅनेजर केवल विकमानी यांनी उपस्थित केलाय. तसंच याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक सुहास पाटील यांना निलंबित करण्याची मागणी त्यांनी केलीये.

या सगळ्या प्रकाराबाबत शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक भगत यांना विचारले असता, संबंधित तरुणावर केस कारण्यात आली असून प्रकरण न्यायालयात पाठवण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं. मात्र अधिकाऱ्याच्या दबंगगिरीवर त्यांनी काहीही प्रतिक्रिया दिली नाही. पुराव्यासहित समोर आलेल्या या प्रकारानंतर वरिष्ठ अधिकारी यांची काही दखल घेतात का? हे पहावे लागेल.

विरोधकांना नोटीस, हे दडपशाही सरकार; जयंत पाटलांच्या ईडी चौकशीवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed