२०२३-२४ च्या अर्थसंकल्पात वंदे भारत मेट्रोची घोषणा करण्यात आली…
वंदे भारत मेट्रो ही भारतातली पहिली स्वदेशी सेमी हाय स्पीड ट्रेन आहे. ही वंदे भारत एक्सप्रेसची एक मिनी आवृत्ती असणार आहे. वंदे भारत मेट्रो ट्रेनची घोषणा केंद्रीय अर्थसंकल्प २०२३-२४ मध्ये करण्यात आली होती. रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, वंदे भारत मेट्रोमध्ये अत्याधुनिक रेक असणार आहेत. हे १०० किलोमीटरपेक्षा कमी अंतरावरील शहरांना जोडले जातील.
वंदे मेट्रोमुळे लोकल गाड्यांवरील गर्दीचा ताण कमी होण्यास मदत होणार असून ही मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी आहे. ही ट्रेन डिसेंबरपर्यंत तयार होईल. तर एकाच मार्गावर दिवसातून ४-५ वेळा ही ट्रेन धावेल. सामान्य वंदे भारत ट्रेनमध्ये १६ डबे असतात पण या ट्रेनला ८ डबे असतील. या ट्रेनची खास बाबा म्हणजे यामुळे प्रवाशांना जलद शटलसारखा अनुभव घेता येणार आहे. यामुळे नोकरदार वर्ग आणि विद्यार्थी कमी वेळेत एका शहरातून दुसऱ्या शहरामध्ये जाऊ शकतील. यावेळी त्यांना जागतिक दर्जाच्या वाहतूक सुविधेचा लाभ घेता येणार आहे.
वंदे मेट्रोमुळे लोकल गाड्यांवरील गर्दीचा ताण कमी होण्यास मदत होणार आहे. ही ट्रेन डिसेंबरपर्यंत तयार होईल. ही ट्रेन एकाच मार्गावर दिवसातून ४-५ वेळा धावेल. मेट्रो ट्रेनप्रमाणेच या ट्रेनला 8 डबे असतील. सामान्य वंदे भारत ट्रेनमध्ये १६ डबे असतात. ही ट्रेन प्रवाशांना जलद शटलसारखा अनुभव देईल. यामुळे नोकरदार लोक आणि विद्यार्थी कमी वेळेत एका शहरातून दुसऱ्या शहरात जाऊ शकतील. त्यांना जागतिक दर्जाच्या वाहतूक सुविधेचा लाभ घेता येणार आहे.