Maharashtra Dams Water Level: जलसंपदा विभागाने बुधवारी याबाबतचा अहवाल सादर केला. राज्यातील धरणांमध्ये सध्या १०,४२१.९० दशलक्ष घनमीटर इतका उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध आहे.
विभागनिहाय आकडेवारीनुसार अमरावती विभागात सर्वाधिक म्हणजे ३८.४० टक्के, नागपूर विभागात ३६.९८ टक्के पाणीसाठा आहे. कोकण विभागात ३१.२६ टक्के, छत्रपती संभाजीनगर विभागात २८.१७ टक्के आणि नाशिक विभागात २६.६६ टक्के पाणीसाठा नोंदविला गेला आहे. मात्र, सर्वांत कमी पाणीसाठा पुणे विभागात असून तो केवळ १५.५४ टक्क्यांवर आला आहे. त्यामुळे पिण्याच्या पाण्यासोबत शेती आणि औद्योगिक वापरासाठीच्या पाणी नियोजनाचे आव्हान उभे राहिले आहे. हवामान विभागाने राज्यात मान्सून आगमनासाठी पोषक परिस्थिती असल्याचे संकेत दिले असले, तरी पावसाची नियमित सुरुवात होईपर्यंत जलसाठ्यांवरील ताण कायम राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
App-Based Taxi Services: टिप द्या, अन्यथा राइड रद्द! ॲप टॅक्सीचालकांची वाढती मनमानी, अतिरिक्त 100-150 रुपयांची मागणी
पुण्याची परिस्थिती चिंताजनक
राज्यात सर्वांत मोठा जलसाठा असलेल्या पुणे विभागातील ७२४ धरणांमध्ये २,३७०.२७ दशलक्ष घनमीटर पाणी उपलब्ध आहे. गेल्या वर्षी याच दिवशी हा साठा २६.८२ टक्के होता. म्हणजेच यंदा सुमारे ११ टक्क्यांची घसरण झाली आहे. खडकवासला, पानशेत, वरसगाव, भाटघर, नीरा देवघर, डिंभे, मुळशी, कोयना आणि वारणा यांसारख्या महत्त्वाच्या प्रकल्पांतील साठाही अपेक्षेपेक्षा कमी आहे. पावसाला आणखी विलंब झाल्यास पुणे विभागातील शहरे आणि ग्रामीण भाग यांना पाणीपुरवठ्याचे नियोजन अधिक काटेकोर करावे लागेल, असा अंदाज आहे.
Sharad Pawar: नेहरु अन् मोदींची तुलना होऊ शकत नाही; वर्धापनदिनाच्या कार्यक्रमात शरद पवारांची जोरदार टोलेबाजी
मुंबईसाठी अवघा १२ टक्के पाणीसाठा
मुंबई : मुंबईला अप्पर वैतरणा, मध्य वैतरणा, मोडक सागर, तानसा, भातसा, विहार आणि तुळशी या धरणांतून पाणीसाठा – होतो. सध्या या धरणांत एकूण १४ लाख ४७ हजार ३६३ दशलक्ष लिटर पाणीसाठ्यापैकी केवळ १ लाख ८० हजार ७५६ दशलक्ष लिटर म्हणजेच १२.४८ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. गेल्या वर्षी याच कालावधीत दहा टक्के आणि सन २०२४मध्ये सहा टक्के पाणीसाठा होता. आता सात धरणांपैकी अप्पर वैतरणा धरणातील उपयुक्त साठा शून्यावर आला आहे. मात्र या धरणात राखीव पाणीसाठा शिल्लक आहे. या धरणासह भातसा धरणातूनही राखीव पाणीसाठा देण्याचा निर्णय राज्य सरकारने आधीच घेतला आहे.
Mumbai Crime : AC लोकलमधून तोतया RPF कर्मचाऱ्याचा फुकट प्रवास, टीसी साळुंखे-कदम मॅडमना संशय, खडसावताच फेफे उडाली, घडाघडा सत्य सांगितलं
राज्यातील पाणीसाठ्याची टक्केवारी
१३८ मोठे प्रकल्प- २४.६२
मध्यम प्रकल्प- ३१.५४
लघु प्रकल्प- २४.१७
३,०२८- धरणांमध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेत घट
३१.२६%- कोकण विभागात शिल्लक पाणी
पुण्यातील परिस्थिती चिंताजनक
