Nagpur Crime: गंभीर जखमी झालेल्या सलमानला मित्रांनी तातडीने रुग्णालयात दाखल केले. प्रथम खासगी रुग्णालयात आणि त्यानंतर मेयो रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले; मात्र, डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
पोलिसांकडून प्राप्त माहितीनुसार, सलमान हा मंगळवारी रात्री साडेदहाच्या सुमारास टीपू सुलतान चौकाजवळील शिवाजी चौक रोडवर उभा राहून मोबाइलवर बोलत होता. यावेळी आरोपी मुज्जमिल आणि साहील हे दुचाकीवरून तेथे पोहोचले. सलमान आणि मुज्जमिल यांच्यात एका युवतीशी असलेल्या प्रेमसंबंधांवरून काही दिवसांपासून वाद सुरू होता. त्याच वादातून दोघांमध्ये पुन्हा बाचाबाची झाली. वादाचे रूपांतर हाणामारीत झाल्यानंतर आरोपींनी सलमानवर धारदार शस्त्राने हल्ला केला. त्याच्या छातीवर, खांद्यावर आणि हातावर वार करण्यात आले.
Vidarbha School Reopening: शाळा 30 जूनलाच! विदर्भाबाबत उच्च न्यायालयाने खडसावले; शिक्षण विभागाचा निर्णय रद्द
घटनेची माहिती मिळताच यशोधरानगर पोलिस आणि गुन्हे शाखा पथकाने घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला. मोहम्मद शोएब मोहम्मद शरीफ अन्सारी यांच्या तक्रारीवरून आरोपींविरुद्ध पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करीत दोन्ही आरोपींना अटक केली.
Nagpur News: पिकनिकचा आनंद घेतानाच काका-पुतण्यासह तिघं बुडाले, नातेवाईकांचा धाय मोकलून आक्रोश, जेवणाचं साहित्यही नदीकाठीच पडून
चोवीस तासांत जामीन
या प्रकरणातील आरोपी मुज्जमिल उर्फ मुज्जू हसन अली याला २४ तासांतच जामीन मिळाला. खुनाच्या प्रकरणात अवघ्या २४ तासांत जामीन मिळण्याची ही गेल्या नजीकच्या इतिहासातील पहिलीच घटना असावी. मुज्जूची अटक करताना त्यांना व त्याच्या कुटुंबीयांना अटकेची माहिती व अटकेमागील कारणे पोलिसांनी सांगितलीच नाही. नियमानुसार अटकेदरम्यान ही माहिती पुरवावी लागते. ती न पुरविल्याने त्याची अटक अवैध व बेकायदेशीर ठरवित प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी एम. डी. बिरहारी यांनी आरोपीची पोलिस कोठडी नामंजूर करीत थेट जामीन मंजूर केला. अॅड. कमल सतुजा यांनी आरोपीची बाजू मांडली.
