म. टा. प्रतिनिधी, पुणे: पुणे जिल्हा आणि आसपासच्या ग्रामीण भागांतील प्रवाशांसाठी पुणे विभागात पहिल्या टप्प्यात १०० जिजाऊ बस दाखल होणार आहेत. त्यापैकी २५ बस दाखल झाल्या असून, त्या ग्रामीण भागात शटल सेवा म्हणून चालवल्या जात आहेत. येत्या काळात मिळणाऱ्या बस विविध आगारांना देऊन ग्रामीण भागातील शटल सेवा सक्षम केली जाणार आहे.
पुण्यातून राज्याच्या कानाकोपऱ्यात बससेवा दिली जाते. पण, पुणे जिल्ह्यातील शहरे, छोटी-मोठी गावे जोडणारी शटल सेवा खूपच कमी आहे. त्या मार्गावर आता नव्याने येणाऱ्या जिजाऊ बस दिल्या जाणार आहेत. पुणे एसटी विभागाने सार्वजनिक वाहतूक अधिक वेगवान, सुरक्षित आणि आधुनिक करण्यासाठी एसटी महामंडळाकडे २५० नवीन ‘राजमाता जिजाऊ’ शटल बसची मागणी केली आहे. यातील पहिल्या टप्प्यात १०० बस येणार आहेत. त्यामधील २५ बस पुणे विभागात दाखल होऊन, त्यांनी सेवा देणे सुरू केले आहे.
शिवाजीनगर आगाराला पाच बस (शिवाजीनगर-भीमाशंकर मार्ग) आणि स्वारगेट आगाराला एक बस देण्यात आली आहे. या एसटी बसला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. एसटी महामंडळाच्या ‘शिवनेरी’ किंवा ‘शिवाई’ यांसारख्या प्रीमियम सेवांच्या तुलनेत ही शटल सेवा सर्वसामान्यांना परवडणारी आहे. महिला प्रवाशांच्या सुरक्षेला यात प्राधान्य देण्यात आले आहे.
एसटी महामंडळाकडे आम्ही २५० बसची मागणी नोंदवली असून, पुढील महिनाभरात १०० बस दाखल होण्याची शक्यता आहे. यामुळे विशेषतः ग्रामीण भागातील प्रवाशांची मोठी सोय होणार असून, या नवीन बस कोणत्या मार्गावर चालवायच्या याचे सूक्ष्म नियोजन आम्ही केले आहे. – कमलेश धनराळे, विभागीय वाहतूक अधिकारी, पुणे एसटी विभाग
राजमाता जिजाऊ बसची वैशिष्ट्ये प्रवासी क्षमता: ५६ आसन क्षमता. सुरक्षा यंत्रणा : पाच सीसीटीव्ही कॅमेरे आणि पॅनिक बटण. अत्याधुनिक तंत्रज्ञान : जीपीएस ट्रॅकिंग आणि इलेक्ट्रॉनिक फलक. विशेष सुविधा : थांबा (स्टॉप) येण्यापूर्वीची अनाउन्समेंट सिस्टीम.
लेखकाबद्दलअक्षय शितोळेअक्षय शितोळे हे २०१८ पासून डिजिटल मीडियात कार्यरत असून सध्या मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. राज्यभरातील रिपोर्टर्ससोबत समन्वय साधत महाराष्ट्रातील गावगाड्यापासून मोठ्या शहरांमधील दैनंदिन घडामोडी मटा ऑनलाइनसाठी वेगवान आणि अचूक पद्धतीने मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. राजकीय बातम्यांमध्ये विशेष रस, बातम्यांमागची बातमी अर्थात घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेण्याचा सातत्याने प्रयत्न असतो. शेती आणि ग्रामीण जीवन हे जिव्हाळ्याचे विषय आहेत.
पत्रकारितेतील अनुभव अक्षय शितोळे यांनी २०१८ मध्ये आपल्या पत्रकारितेतील प्रवासाचा प्रारंभ केला. सुरुवातीला न्यूज १८ लोकमत या वेबसाईटसाठी काम करताना ट्रेनी, सब एडिटर असा त्यांचा प्रवास राहिला. या कार्यकाळात प्रामुख्याने राजकीय बातम्यांसह स्थानिक पातळीवरील विविध घडामोडी कव्हर करण्याचे काम त्यांनी केले. २०१९ च्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध राजकीय घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेतला. पुढे २०२१ मटा ऑनलाइनमध्ये डिजिटल कंटेट प्रोड्युसर म्हणून जॉइन झाले. यावेळी राजकीय बातम्यांसह विविध जिल्ह्यांतील प्रतिनिधींशी समन्वय ठेवत वेबसाईटसाठी वेगवान आणि अचूक बातम्या मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न राहिला. तसंच मटा ऑनलाइनला २५ वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी महाराष्ट्राच्या दोन दशकांच्या सामाजिक वाटचालीचा आढावा घेणारा विशेष लेख लिहिला होता. “आरक्षणाचे लढे आणि तिढे, टोकदार जातीय अस्मिता ; २५ वर्षांत कसं ढवळून निघालं महाराष्ट्राचं समाजमन?” शीर्षकाखाली लिहिलेल्या या लेखाच्या माध्यमातून महाराष्ट्रात मागील २५ वर्षांत जी सामाजिक स्थित्यंतरे झाली, ज्या घटनांनी महाराष्ट्राच्या सामाजिक रचनेवर परिणाम केला, अशा घडामोडींचा सविस्तर आढावा घेतला होता. २०२३ मध्ये त्यांनी लोकमत ऑनलाइनसोबतही काम केले असून ते २०२५ पासून पुन्हा मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिलट कंटेंट प्रोड्युसर म्हणून रुजू झाले. विविध जिल्ह्यांतील रिपोर्टर्ससोबत संवाद साधत स्थानिक घडामोडींसह राज्यभरात महत्त्वाच्या बातम्या कव्हर करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. तसंच विश्लेषणात्मक व्हिडिओच्या माध्यमातून राजकीय घटनांचे अन्वयार्थ प्रेक्षकांसमोर उलगडण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. महाराष्ट्रात २०२५-२६ साली झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध विश्लेषणात्मक व्हिडिओंच्या माध्यमातून राजकीय घडामोडींचं सोप्या शब्दांत विश्लेषण केले. तसंच महानगरपालिका निवडणूक निकालानंतर राजकीय विश्लेषकांची मुलाखत घेत या निवडणूक निकालाचा वेध घेण्याचा प्रयत्न केला.
मुलाखतीची लिंक: Uddhav Thackeray यांचा BMC मध्ये का झाला पराभव? सविस्तर विश्लेषण – https://youtu.be/8UeV9w1vwxQ?si=2sMWoovyx07EpjVU
शैक्षणिक पात्रता अक्षय शितोळे यांनी १२ वी पर्यंतचे शिक्षण आपल्या मूळ गावी घेतले असून नंतर त्यांनी मुंबई येथील नामांकित असलेल्या रुईया महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी (Bachelor of mass media) चे शिक्षण पूर्ण केले.… आणखी वाचा