यवतमाळ/प्रतिनिधी : चिमुकल्या मुलासह आईने गळफास लावून आत्महत्या केली. ही घटना यवतमाळ शहरातील अशोक नगर परिसरात दि. २० मे रोजी सायंकाळच्या सुमारास उघडकीस आली. रेश्मा वंडकर (३८) आणि पूर्वेश वंडकर (८) (दोघेही रा. सिंहगड रोड कोल्हेवाडी, पुणे, हल्ली मुक्काम अंबिका नगर, यवतमाळ) असे मृत आई-मुलाचे नाव आहे. या प्रकरणी रितेश देशभ्रतार (रा. आंबेडकर नगर यवतमाळ) यांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली.बहिणीचे १४ मे रोजी लग्न असल्याने मोठी ताई रेश्मा वंडकर ही तिचा आठ वर्षीय मुलगा पूर्वेश याच्यासह एक महिन्यापूर्वी यवतमाळ येथे आली होती. रेश्मा हिचा मुलगा गतिमंद असल्याने, उपचार करण्याच्या उद्देशाने तिने मुलासह यवतमाळला राहण्याचा निर्णय घेतला. दि. ३ मे रोजी शहरातील अशोक नगर येथे रेश्मा हिने भाड्याने रूम केली होती. दरम्यान दि. १४ मे रोजी रेश्माच्या बहिणीचा विवाह झाल्यानंतर ती मुलासह भाड्याने केलेल्या घरात राहत होती.
अशात शनिवारी दुपारच्या सुमारास तिने अशोक नगर येथील आईच्या घरी कुणी नसल्याचे बघून आठ वर्षीय चिमुकल्यासह गळफास लावून आत्महत्या केली. ही घटना सायंकाळच्या सुमारास उघडकीस आल्याने एकच खळबळ उडाली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेता शहर पोलिस ठाण्यातील महिला पोलिस उपनिरीक्षक वानखेडे यांनी कर्मचार्यांसह अंबिका नगर येथे धाव घेऊन पाहणी केली.

त्यानंतर घटनास्थळाचा पंचनामा करून नागरिकांच्या मदतीने मृतदेह खाली उतरून जिल्हा शासकीय रुग्णालयात उत्तरीय तपासणी करता पाठविला. या प्रकरणी वृत्त लिहीपर्यंत गुन्हा नोंद होण्याची प्रक्रिया सुरू होती. या प्रकरणाचा पुढील तपास प्रभारी ठाणेदार जनार्दन खंडेराव यांच्या मार्गदर्शनाखाली शहर पोलिस करीत आहे.
मृत्यूपूर्वी लिहिली सुसाईड नोट
रेश्मा वंडकर हिने मृत्यूपूर्वी सुसाईड नोट लिहिल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे. ती सुसाईड नोट पोलिसांनी जप्त केली असून त्यात आत्महत्येबाबत कोणावरही आरोप नसल्याचा उल्लेख आहे. तसेच नैराश्यातून रेश्मा हिने आत्महत्या केल्याची माहिती पोलिस सूत्रांकडून समोर आली आहे.