• Mon. Nov 25th, 2024

    दारूच्या भट्ट्या शोधत बसतात शरद पवार, सुप्रिया सुळे आणि अजित पवार; अजितदादांनी लगावला टोला

    दारूच्या भट्ट्या शोधत बसतात शरद पवार, सुप्रिया सुळे आणि अजित पवार; अजितदादांनी लगावला टोला

    बारामती : ‘पाहुणेवाडी गावातील दारूबंदी करा, आता शरद पवार, सुप्रिया सुळे, अजित पवार येतो आणि कुठे कुठे भट्ट्या आहेत त्या शोधत बसतो. पोलीस निवांत पगार घेतील. तुम्हाला आम्ही सॅल्युटच करतो’,अशा सुरात भर सभेत विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी अवैद्य दारू धंदे बंद होत नसल्याबाबत पोलीस प्रशासनाला सुनावले.बारामती तालुक्यातील पाहुणेवाडी येथे आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन विरोधी पक्ष नेते अजित पवार यांच्या हस्ते झाले. उद्घाटनानंतर उपस्थितांना संबोधित करत असताना गावातील दारूबंद करण्याबाबत अजित पवारांकडे निवेदन दिले. भर सभेत दिलेले निवेदन वाचत पाहुणेवाडी गावातील दारूबंदी करा, असा नारा देत आता शरद पवार, सुप्रिया सुळे, अजित पवार येतो. आणि कुठे कुठे भट्ट्या आहेत त्या शोधत बसतो. पोलीस निवांत पगार घेतील. तुम्हाला आम्ही सेल्युटच करतो.. असे म्हणत पोलिसांवर नाराजी व्यक्त केली.

    भयानक! वाहनांमधून लोखंडी रॉड, फावडी घेऊन ते आले, थेट घर खोदले, घराला आग लावली, महिलांना मारहाण केली
    ग्रामस्थांनी केली अजित पवारांकडे तक्रार

    ग्रामस्थांनी दिलेले निवेदन पवारांनी भर सभेत वाचून दाखविले. ग्रामस्थांनी निवेदनात म्हटले आहे की, पुणे ग्रामीण व माळेगाव पोलीस ठाणे यांना दारूबंदी होण्याबाबत पत्र व्यवहार केला होता मात्र त्यांनी दखल घेतली नाही, अशी थेट तक्रारच ग्रामस्थांनी पवारांकडे केली. ग्रामस्थांच्या या निवेदनाची गंभीर दखल घेत पवारांनी पोलिसांना चांगलेच सुनावले.

    पुढे बोलताना पवार म्हणाले, पुढच्या वेळी कोणी पाहुणेवाडीचे मला भेटले तर आवर्जून सांगा की, दादा तुम्ही सांगितल्यानंतर पोलिसांनी दारूबंदीसाठी पावले उचलली. उद्या माझी जरी भट्टी सापडली तरी मला पकडा आणि टायर मध्ये घाला, असे म्हणतातच उपस्थितांमध्ये हशा पिकला.

    पापुआ न्यू गिनीमध्ये पंतप्रधान मोदींचे भव्य स्वागत, पंतप्रधान जेम्स मारापे यांनी केला चरणस्पर्श
    पोलिसांच्या कारवाईत सातत्य नाही- अजित पवार

    बारामतीतील कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्याबरोबरच अवैध व्यवसाय बंद करण्याच्या सूचना विरोधी पक्षनेते अजित पवार वारंवार करत असतात. त्यानुसार पोलीस जोरदार कारवाया पण करतात. मात्र त्यात सातत्य नसल्याचा फायदा घेत पुन्हा अवैद्य धंद्यावाले आपला व्यवसाय सुरू ठेवतात.

    धक्कादायक! चोरीची माहिती पोलिसांना दिल्याचा राग, ८ जणांचा महिलेवर अमानुष अत्याचार

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed