• Sat. Sep 21st, 2024

उन्हाळ कांदा गडगडला! चांदवड बाजार समितीत कांदा शंभर रुपये प्रतिक्विंटल; लिलाव बंद

उन्हाळ कांदा गडगडला! चांदवड बाजार समितीत कांदा शंभर रुपये प्रतिक्विंटल; लिलाव बंद

Summer onion Price : चांदवडला शनिवारी कांदा लिलावादरम्यान कांद्यास किमान प्रतिक्विंटल १०० रुपये इतका कमी दर पुकारण्यात आला. यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी लिलाव बंद पाडला.

 

summer onion
उन्हाळ कांदा गडगडला
म. टा. वृत्तसेवा, चांदवड : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शनिवारी (दि. २० मे) सकाळच्या सत्रात कांदा लिलावादरम्यान कांद्यास किमान प्रतिक्विंटल १०० रुपये इतका कमी दर पुकारण्यात आला. त्यामुळे संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी कांद्याचे लिलाव बंद पाडत मुंबई-आग्रा महामार्गावर धरणे आंदोलन केले. दरम्यान, माजी आमदार शिरीकुमार कोतवाल यांनी मध्यस्थी करण्याचे प्रयत्न केला. मात्र, दुपारनंतर पुन्हा कांद्याला योग्य भाव मिळाला नाही.चांदवड कृषी उत्पन्न बाजार आवारात कांद्याला शनिवारी किमान शंभर रुपये प्रतिक्विंटल इतका कमी दर मिळाल्याने शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला. तसेच कांद्याचे लिलाव बंद पाडत सकाळी दहाच्या सुमारास राष्ट्रीय महामार्गावर पेट्रोलपंप चौफुली येथे आंदोलन केले. यावेळी कांदा उत्पादक शेतकऱ्यांकडून प्रचंड घोषणाबाजी करण्यात आली. माजी आमदार शिरीषकुमार कोतवाल यांनी मध्यस्थी करीत शेतकरी व व्यापारी यांच्यात समन्वय घालून देत शेतकऱ्यांच्या मालास योग्य भाव मिळावा, अशी ग्वाही देत कांदा लिलाव पूर्वरत करण्यास प्रयत्न केले. मात्र, दुपारच्या सत्रातदेखील कांद्याला शंभर रुपये प्रतिक्विंटल भाव मिळाल्याने पुन्हा एकदा शेतकऱ्यांनी पुन्हा लिलाव बंद पाडले. बाजार समिती प्रशासनातर्फे सचिव गोरक्षनाथ गांगुर्डे व कर्मचाऱ्यांनी समन्वय साधून पुढील लिलाव पूर्वरत करण्यात आले. या सर्व प्रक्रियेमध्ये कांद्याला कवडीमोल भाव मिळत असल्याने शेतकऱ्यांमध्ये प्रचंड नाराजी दिसून आली.

पांढऱ्या सोन्याच्या दराकडून अपेक्षाभंग, कापसाचा भाव घसरल्यानं शेतकऱ्यांपुढं अडचणीचा डोंगर, सरकार मार्ग काढणार?
…असे होते बाजारभाव (रुपयांमध्ये)
उन्हाळ कांदा
किमान..कमाल..सरासरी
१००..१,२७५..४००
गोल्टी कांदा
१००..८२१..३००

जवळच्या शहरातील बातम्या

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed