• Sun. Jul 5th, 2026

    सिद्धरामय्या सरकारचा आज शपथविधी

    ByMH LIVE NEWS

    May 20, 2023
    सिद्धरामय्या सरकारचा आज शपथविधी

    मुख्यमंत्री कोण होणार यावरुन चर्चा रंगल्या होत्या.

    सिद्धरामय्या सरकारचा आज शपथविधी सोहळा पार पडणार आहे. सिद्धरामय्या मुख्यमंत्री म्हणून, तर डी. के. शिवकुमार उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतील. . शपथविधीपूर्वी काँग्रेस नेते सिद्धरामय्या आणि डी. के. शिवकुमार यांनी दिल्लीला जाऊन मंत्रिमंडळाची स्थापना आणि खातेवाटपावर चर्चा केली.मुख्यमंत्री कोण होणार यावरुन चर्चा रंगल्या होत्या. अखेर राज्याच्या मुख्यमंत्रीपदाचा निर्णय जाहीर झाला असून कॉंग्रेस हायकमांडने पुन्हा एकदा सिद्धरामय्या यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले आहे.

    डी. के शिवकुमार आणि सिद्धरामैय्या यांच्यामध्ये मुख्यमंत्रीपदावरुन रस्सीखेच सुरू होती.काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांबरोबरच विरोधी पक्षांच्या नेत्यांनाही आमंत्रित करण्यात आले आहे. दुपारी साडेबारा वाजता सरकारचा शपथविधी होणार असून त्याची तयारी सुरू आहे.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed