Navnath Ban On Uddhav Thackeray: हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचे होऊ शकले नाहीत, ते रामचंद्रांचे काय होणार?’ अशी टीका बन यांनी केली.
मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. ‘प्रभू रामचंद्र मंदिराच्या आंदोलनाच्या वेळेला भाजप आणि तमाम ‘हिंदू मंदिर वही बनाएंगे’ अशा घोषणा देत होते, तेव्हा हेच उद्धव ठाकरे ‘मंदिर वही बनाएंगे, तारीख नही बताएंगे’ असे म्हणत त्यांची खिल्ली उडवत होते. ही तुमची प्रभू रामचंद्रांची भक्ती आणि ही तुमची रामरक्षा. आपला पक्ष काँग्रेसच्या दावणीला बांधून तुम्ही प्रभू रामचंद्रांचे विचारही सोडून दिले.
Mumbai Rain : मुंबईतल्या पावसातलं हे दृश्य पाहून अनेकांनी VIDEO रिवाइंड केला; वंदे भारत ट्रेनमुळे नेमकं काय घडलं?
‘हिंदूंमध्ये फूट पाडण्याचे कारस्थान’
‘प्रभू रामचंद्रांच्या अयोध्या येथील मंदिरात अपहार करणाऱ्या एकाही आरोपीला सोडले जाणार नाही, या आरोपींना कठोरातील कठोर शिक्षा व्हावी यासाठी प्रयत्न केले जात आहेत. एवढेच काय तर त्या आरोपींना वकीलही मिळू नये यासाठीही सारेजण प्रयत्न करत आहेत. पण, तुम्ही मात्र हिंदूंमध्ये फूट पाडण्यासाठी कारस्थान आखण्याचा प्रयत्न करत आहात’, अशी टीकाही बन यांनी ठाकरे यांच्यावर केली.
‘उद्धव ठाकरे यांनी रामाला साकडे घालावे’
सांगली : ‘माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अयोध्येला जाणारच आहेत, तर त्यांनी मुंबईत रामरक्षा आंदोलन करण्यापेक्षा आपले आमदार फुटू नये म्हणून अयोध्येत श्री रामाला साकडे घालावे,’ असा टोला केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी लगावला. मिरजेतील एका कार्यक्रमाच्या निमित्ताने सांगली दौऱ्यावर आलेले आठवले यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
Mumbai News: साकीनाका मृत्यू प्रकरणात पोलिसांना कंत्राटदार सापडेना; ३ मजूर सापडले, त्यांनाच ताब्यात घेतले!
आज श्री रामरक्षा घंटानाद
छत्रपती संभाजीनगर : अयोध्या येथील श्री राम मंदिराच्या देणगीमध्ये झालेल्या अपहाराच्या निषेधार्थ शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे रविवारी (पाच जुलै) राज्यव्यापी श्री रामरक्षा घंटानाद आयोजिण्यात आला आहे. छत्रपती संभाजीनगरातही घंटानाद करण्यात येणार आहे. रविवारी सकाळी दहा वाजता सुपारी हनुमान मंदिरात जिल्हाव्यापी घंटानाद व महाआरतीचे आयोजन करण्यात आले आहे.
