Pune Crime News : राज्यात दिवसेंदिवस गुन्हेगारीचं प्रमाण वाढत चाललं आहे. अशातच पुण्यातून एक संतापजनक बातमी समोर आली आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.
गुदद्वारात कॉम्प्रेसरचा पाइप घातल्याने पोटात हवा
फिर्यादी संतोषकुमार किशोर यादव (वय ३२) यांनी याबाबत तक्रार दाखल केली आहे. त्यांच्या फिर्यादीनुसार, ३० जून २०२६ रोजी पहाटे पाचच्या सुमारास सणसवाडी येथील वेस्टर्न इंडिया फोर्ज प्रा. लि. कंपनीमध्ये ही घटना घडली. आरोपी बिकीकुमार भाईलाल सरोज याने फिर्यादीचा मेहुणा नरेश सुलेंद्र यादव (वय ४२, मूळ जि. गया, बिहार) यांच्या गुदद्वारात कॉम्प्रेसरचा पाइप घातल्याने त्यांच्या पोटात मोठ्या प्रमाणात हवा गेली. त्यानंतर त्यांना गंभीर अवस्थेत उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारांदरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
Crime News: गोव्याला जाऊन क्रूझवर करायचं होतं बर्थडे सेलिब्रेशन, तरुणाने व्यवसायिकाला संपवलं अन् घरी जाऊन झोपला; नंतर असा झाला उलगडा
कामगारांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर
कामाच्या ठिकाणी घडलेल्या या घटनेमुळे औद्योगिक सुरक्षा, कामगारांवरील देखरेख, सुरक्षा नियमांची अंमलबजावणी आणि पर्यवेक्षण यावर गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. तपासादरम्यान कंपनी व्यवस्थापनाची कोणतीही जबाबदारी किंवा निष्काळजीपणा समोर आल्यास त्याबाबत कायदेशीर कारवाई केली जाईल का, याकडेही सर्वांचे लक्ष लागले आहे.
फिर्यादीच्या तक्रारीवरून शिक्रापूर पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या विचित्र घटनेमागील नेमके कारण, हेतू आणि इतर सर्व बाबींचा तपास सुरू आहे. या प्रकरणात कंपनी व्यवस्थापनाची भूमिका काय होती किंवा त्यांचा निष्काळजीपणा आढळून येतो का, याबाबत सखोल तपासानंतरच चित्र स्पष्ट होऊ शकेल, अशी माहिती तपास अधिकारी सहायक पोलिस निरीक्षक संतोष कारंडे यांनी दिली.
Jalna Bus Accident : भरधाव एसटी बसेस एकमेकांना धडकल्या, वाहनांचं प्रचंड नुकसान, विद्यार्थ्यांसह 30 प्रवासी गंभीर; पहाटे भीषण अपघात
डॉक्टर तरुणीची आत्महत्या
एका डॉक्टर तरुणीने चोवीस मजली इमारतीवरून उडी मारून आत्महत्या केली. ही घटना शुक्रवारी (तीन जुलै) रावेत येथील ‘ऑस्ट्रिया रॉयल्स’ या इमारतीच्या बांधकामस्थळी घडली. श्वेता तुळशीराम रोकडे (वय २९, रा. सेलेस्टीयल सोसायटी) असे आत्महत्या केलेल्या तरुणीचे नाव आहे. वरिष्ठ पोलिस निरीक्षक ऋषिकेश घाडगे यांनी दिलेल्या माहितीनुसार, श्वेता तुळशीराम रोकडे या डॉक्टर असून त्या मैत्रिणीसोबत राहत होत्या. दरम्यान, त्या शुक्रवारी जवळच असलेल्या ‘ऑस्ट्रिया रॉयल्स’ इमारतीत सकाळी साडेनऊच्या सुमारास गेल्या. काही वेळाने इमारतीवरून कोणी तरी पडल्याचे लक्षात आले. आत्महत्येचे नेमके कारण समजू शकलेले नाही.
