• Sun. Jul 5th, 2026
    Uday Samant: मनोरी चार वर्षांत पूर्णत्वास; निःक्षारीकरण योजनेबाबत उदय सामंत यांची विधानसभेत माहिती

    Uday Samant: समाजवादी पक्षाचे अबू आझमी यांनी मनोरी येथील नि:क्षारीकरण प्रकल्पाबाबत प्रश्न विचारला होता. या प्रश्नाला सामंत यांनी उत्तर दिले.

    मनोरी(फोटो– महाराष्ट्र टाइम्स)
    मुंबई : मुंबईला विविध सात धरणांमधून दररोज सुमारे ४ हजार १०० दशलक्ष लिटर पाणीपुरवठा केला जात असला तरी शहराची एकूण गरज ४ हजार ६६५ दशलक्ष लिटर आहे. ही तूट भरून काढण्यासाठी मनोरी येथे खारे पाणी गोडे करण्याचा उभारण्यात येणारा दोनशे एमएलडी क्षमतेचा नि:क्षारीकरण प्रकल्प येत्या चार वर्षांत पूर्ण केला जाईल, अशी माहिती मंत्री उदय सामंत यांनी शुक्रवारी विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली.

    नि:क्षारीकरण प्रकल्पामुळे मुंबईला अतिरिक्त दोनशे एमएलडी पाणी उपलब्ध होणार आहे, असे त्यांनी सांगितले. हा प्रकल्प सुरू झाल्यानंतर एक हजार लिटर पाण्यासाठी सुमारे ३५ रुपये, म्हणजेच प्रतिलिटर १५ ते १७ पैसे खर्च अपेक्षित असल्याची माहितीही त्यांनी दिली.

    Maharashtra TimesMumbai News: साकीनाका मृत्यू प्रकरणात पोलिसांना कंत्राटदार सापडेना; ३ मजूर सापडले, त्यांनाच ताब्यात घेतले!
    मनोरीतील नि:क्षारीकरण प्रकल्प संयुक्त भागीदारी तत्त्वावर विकसित करण्यात येत असून यासाठी मे. जीव्हीपीआर इंजिनीअर्स लिमिटेड आणि मे. आय. डी. ई. टेक्नॉलॉजी लिमिटेड यांच्या संयुक्त भागीदारी उपक्रमाची नियुक्ती करण्यात आली आहे. प्रकल्पासाठी महाराष्ट्र किनारी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरण तसेच केंद्र शासनाच्या पर्यावरण, वन आणि वातावरणीय बदल मंत्रालयाकडून किनारपट्टी नियमन क्षेत्र संदर्भातील आवश्यक मान्यता प्राप्त झाली आहे, असेही सामंत म्हणाले.

    या प्रकल्पाच्या बांधकामासाठी ४ हजार ७७ कोटी रुपये खर्च होणार असून, त्यामध्ये कोणतीही वाढ झालेली नाही. कार्यादेशानुसार प्रकल्पाच्या बांधकामाचा कालावधी ४८ महिने असून, त्यानंतर २० वर्षांचा प्रचलन आणि परिचालन कालावधी निश्चित करण्यात आला आहे, अशी माहितीही सामंत यांनी यावेळी दिली. मनोरी प्रकल्पपाठोपाठ वर्सोव्यातही नि:क्षारीकरण प्रकल्प उभारला जाणार आहे. या प्रकल्पातूनही समुद्राच्या पाण्यावर प्रक्रिया करून दररोज दोनशे दशलक्ष पाणी उपलब्ध केले जाणार आहे.

    Maharashtra TimesUddhav Thackeray: अब हिंदू माफ नहीं करेगा! राम मंदिर अपहारप्रकरणी उद्धव ठाकरे आक्रमक, ५ जुलैला दादरमध्ये ‘रामरक्षा’ आंदोलन
    पाच वॉर्डाना पाणी मिळणार
    मनोरी प्रकल्प पूर्ण होताच पी उत्तर मालाड, पी दक्षिण गोरेगाव, आर मध्य बोरिवली पश्चिम, आर उत्तर दहिसर आणि आर दक्षिण कांदिवली या वॉडांना या प्रकल्पातून पाणी मिळेल. सध्या भांडुप संकुलातील जलशुद्धीकरण केंद्रातून मुंबई शहर व पश्चिम उपनगरांना पाणीपुरवठा होतो. मनोरीतील प्रकल्प कार्यन्वित होताच, भांडुप संकुलातील या पाच वॉडांच्या वाट्याचे पाणी शिल्लक राहणार आहे. त्यामुळे संकुलातील पाणी गरज असेल तेथे वळवता येईल.

    किशोरी तेलकर

    लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर

    किशोरी तेलकर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. किशोरी या २०२२पासून मटा ऑनलाइन सोबत जोडलेल्या आहेत. राजकारण, हायपर लोकल स्टोरी, क्राईम बातम्या, महिलांविषयक समस्या, गाव खेड्यातल्या बातम्या करण्याचा त्यांचा अनुभव आहे.

    पत्रकारितेतील अनुभव
    किशोरी यांना वृत्तपत्र, टीव्ही आणि डिजिटल माध्यमांमधील ६ वर्षांचा अनुभव आहे. किशोरी यांनी सकाळ वृत्तपत्रातून पत्रकारितेला सुरुवात केली. सकाळ वृत्तपत्रात काम करतांना त्यांनी प्रिंट मीडियासोबतच सोशल मीडिया हॅंडलिंग, वेबसाईटचेही काम केलं आहे. सध्या चार वर्षांपासून त्या महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कार्यरत आहेत. लेखन कौशल्याच्या जोरावर सामाजिक समस्या, शाळा- कॉलेज विद्यार्थी समस्या, आरोग्य टिप्स, महिलांविषयक प्रश्न, फॅशन, लाइफस्टाइल या विविध विषयांवर त्यांनी बातम्या केल्या आहेत.

    शैक्षणिक पात्रता
    किशोरी तेलकर यांनी कै. बिंदू रामराव देशमुख कला व वाणिज्य महिला महाविद्यालय, नाशिकरोड येथून एम.कॉम पदवी संपादन केली. त्यानंतर गोखले एज्युकेशन सोसायटीचे एच.पी.टी आर्ट्स अँड आर.वाय.के सायन्स कॉलेजमधून कम्युनिकेशन अँड जर्नलिझम विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. जर्नलिझमचे शिक्षण घेत असतानाच किशोरी यांनी देशदूत, दिव्यमराठी सारख्या वृत्तपत्रात इंटर्नशिप केलेली आहे. मराठी भाषेवर प्रभुत्व असून हिंदी, इंग्रजी भाषाही त्यांना अवगत आहेत.… आणखी वाचा