• Mon. Nov 25th, 2024
    Mumbai Mhada House: म्हाडाच्या ४०८३ घरांसाठी सोमवारी सोडत; मुंबईत कुठे घरं मिळणार जाणून घ्या…

    Patil Prashant | Maharashtra Times | Updated: 20 May 2023, 8:51 am

    Mumbai Mhada House Advertising : म्हाडाच्या मुंबई मंडळामार्फत जाहीर झालेल्या चार हजार ८३ घरांसाठी सोमवार, २२ मे रोजी जाहिरात प्रसिद्ध होणार आहे. या सोडतीत दादर, अँटॉप हिल, सायन, परळ, मुंबई सेंट्रल, गोरेगाव, विक्रोळी, जुहू आणि अंधेरी आदी भागांतील घरांचा समावेश आहे.

     

    मुंबई म्हाडा घरांची सोडत
    मुंबई : म्हाडाच्या मुंबई मंडळामार्फत जाहीर झालेल्या चार हजार ८३ घरांसाठी सोमवार, २२ मे रोजी जाहिरात प्रसिद्ध होणार आहे. या सोडतीत दादर, अँटॉप हिल, सायन, परळ, मुंबई सेंट्रल, गोरेगाव, विक्रोळी, जुहू आणि अंधेरी आदी भागांतील घरांचा समावेश आहे.

    या सोडतीसाठी नोंदणी, अर्जविक्री, अर्जस्वीकृती प्रकियेस २२ मेपासून सुरुवात होणार आहे. सोडतीत पहाडी गोरेगाव येथील पंतप्रधान आवास योजनेत अत्यल्प उत्पन्न गटासाठी ३०५ चौरस फुटांची एक हजार ४७ घरे असून त्यांची किंमत ३३ लाख ४४ हजार आहे. तसेच, अल्प गटासाठी एक हजार २२, तर मध्यम गटासाठी १३२ आणि उच्च गटासाठी ३९ घरे आहेत. ही सोडत १८ जुलैला वांद्रे पश्चिम येथील रंगशारदा सभागृहात काढण्यात येणार आहे.

    म्हाडाकडून अधिक अपेक्षा

    सर्वसामान्य मुंबईकरांचे घरांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी म्हाडाकडून घरांची सोडत काढण्यात येते. मुंबईत घरांच्या किंमती प्रचंड वाढल्या असताना मुंबईकरांच्या म्हाडाकडून अधिक अपेक्षा आहेत. या घरांच्या किंमती परवडणाऱ्या असाव्यात, अशी प्रतिक्रिया सर्वसामान्यांकडून व्यक्त होत आहे.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed