• Sat. Sep 21st, 2024
जळगाव जिल्ह्यात शोककळा! जवानाला आसाममध्ये वीरमरण, कुटुंबीयांची ती भेट ठरली अखेरची

जळगाव : जळगाव जिल्ह्यातील अमळनेर तालुक्यातील लोण गावातील सीमा सुरक्षा दलात असलेल्या जवानाचा मंगळवारी सैन्य दलाच्या गाडीतून अरुणाचल प्रदेशात जात असतांना अपघातात मृत्यू झाला आहे. लीलाधर नाना पाटील (वय ४२ वर्षे) असे वीरमरण आलेल्या जवानाचं नाव आहे. सैन्य दलाच्या ज्या गाडीतून लीलाधर पाटील हे इतर जवानांसोबत जात होते, त्या गाडीचे अचानक मागचे फाटक तुटल्याने लीलाधर पाटील हे खाली पडले. दगडाचा मार लागल्याने त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे.अमळनेर तालुक्यातील लोण येथील लीलाधर पाटील हे सीमा सुरक्षा दलात कार्यरत होते. सध्या ते आसाम राज्यातील गुवाहाटी येथे कर्तव्य बजावत होते. त्यांचा सेवेचा कार्यकाळ संपला होता. त्यानंतरही त्यांनी देशसेवेसाठी, भारतमातेच्या सेवेसाठी दोन वर्षांचा सेवेचा कार्यकाळ वाढवून घेतला होता. याचदरम्यान लीलाधर पाटील यांची आसाम राज्यातील गुवाहाटी येथून अरुणाचल प्रदेशात बदली झाली होती. अरुणाचल प्रदेश हे आसाम राज्यापासून ४०० किलोमीटर अंतरावर आहे. त्यामुळे मंगळवारी सैन्य दलाच्या ट्रकमधून लीलाधर पाटील यांच्यासह २० जवानांची एक तुकडी अरुणाचल प्रदेश सेवेच्या ठिकाणी रुजू होण्यासाठी मार्गस्थ झाली.

जीन्स, स्कर्ट-टॉप आणि शॉर्ट्स घालून मंदिरात प्रवेश नाही, पाहा कोणत्या मंदिराने काढले फर्मान
जवानांच्या डोळ्यादेखत लीलाधर पाटील वाहनातून पडले…अन् क्षणातंच….

सीमा सुरक्षा दलाचो जवान ट्रकमधून पहाडी रस्त्याने अरुणाचल प्रदेश मध्ये जात होते. या वाहनात जवान लीलाधर पाटील हे मागच्या बाजूने बसले होते. याचदरम्यान प्रवासात एके ठिकाणी अचानक जवान जात असलेल्या ट्रकचे मागचे फाटक तुटले. यात काही कळण्याच्या आत मागे बसलेले लीलाधर पाटील हे ट्रकमधून बाहेर खाली पडले. खाली पडल्यानंतर दगडांचा जोरदार मार लागल्याने लीलाधर पाटील यांचा जागीच मृत्यू झाला. वाहन थांबवून वाहनातील जवान हे लीलाधर पाटील पडल्याच्या दिशेने धावले. मात्र तोपर्यंत लीलाधर पाटील यांची प्राणज्योल मालवली होती.

दिल्ली हादरली! त्याने स्वत:सह कुटुंबाला संपविले, धक्कादायक घटनेने पोलीसही चक्रावले
दोन महिन्यांपूर्वी कुटुंबीयांची भेट ठरली अखेरची

मयत लीलाधर पाटील यांच्या पश्चात आई मीराबाई, वडील नाना पौलत पाटील, पत्नी, एक मुलगा व एक मुलगी व तीन भाऊ असा परिवार आहे. लीलाधर यांचा मुलगा सुयश हा नववीत शिकत आहे, तर मोनाक्षी ही सहावीत शिकत आहे. तीन भावंडांमध्ये लीलाधर हे दुसऱ्या क्रमाकांचे होते. त्यांचे मोठे भाऊ रवींद्र पाटील व लहान भाऊ किरण हे दोघेही शेती करतात. लीलाधर पाटील यांना देशसेवेची आवड असल्याने ते सीमा सुरक्षा दलात भरती झाले होते.

लोण गावातील आणखी एक जवान हा लीलाधर पाटील यांच्याप्रमाणेच सीम सुरक्षा दलात कार्यरत आहे. याच जवानाने लीलाधर पाटील यांचा अपघातात मृत्यू झाल्याची माहिती गावात कळविली. वडिलांच्या मृत्यूने त्यांच्या दोन्ही मुलांचे पितृछत्र हरपले आहे. लीलाधर पाटील यांचे पार्थीव १८ मे रोजी त्यांच्या मूळ गावी लोण येथे आणण्यात येणार आहे. याठिकाणी शासकीय इतमामात त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जाणार आहे.

Sex racket in Pune: पुण्यात मोठ्या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश; भोजपुरी अभिनेत्री, मॉडेलला पकडले
दरम्यान लीलाधर पाटील हे दोन महिन्यांपूर्वी रजेवर लोण गावात आले होते. रजा संपल्यानंतर ते पुन्हा दोन महिन्यांपूर्वी कर्तव्यावर रुजू झाले होते. दुर्देवी घटनेत मृत्यू झाल्याने लिलाधर पाटील यांची दोन महिन्यांपूर्वीची त्यांच्या कुटुंबीयांची घेतलेली भेट अखेरली ठरली आहे. लीलाधर पाटील यांच्या मृत्यूने लोण गावासह संपूर्ण अमळनेर तालुक्यातून हळहळ व्यक्त केली जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed