• Sat. Sep 21st, 2024
CCTV : टॅटूने जीव घेतला, BMW कार ट्रकवर धडकली, मुंबईत २९ वर्षीय एअर हॉस्टेसचा मृत्यू

मुंबई : एअर हॉस्टेस म्हणून नोकरी लागली, पण हातावरचा टॅटू अडसर ठरत होता. तोच काढण्यासाठी दिल्लीहून २९ वर्षीय तरुणी मुंबईला आली, मात्र तिथे तिच्या नशिबी काही वेगळंच लिहून ठेवलं होतं. तिघा जणांसह बीएमडब्ल्यू कारने प्रवास करणाऱ्या तरुणीला मुंबईतील जुहू परिसरात भीषण अपघात झाला. या अपघातात तिचा मृत्यू झाला, तर इतर तिघे जखमी झाले आहेत.पल्लवी भट्टाचार्य असे मयत तरुणीचे नाव आहे. अपघाताच्या वेळी बीएमडब्ल्यू कार चालवणारा तिचा मित्र मद्यधुंद अवस्थेत असल्याचे बोलले जात होते, मात्र प्राथमिक अहवालात त्याला पुष्टी मिळालेली नाही. वाहनावरील नियंत्रण सुटल्याने त्याच्या गाडीने बीएमसीच्या कचऱ्याच्या ट्रकला मागून धडक दिली.

पल्लवी भट्टाचार्य, कार चालवणारा तिचा २७ वर्षीय मित्र अर्ध्वयू विजय बांदेकर आणि इतर दोघे जण साकीनाका परिसरात पार्टी करुन गुरुवारी पहाटेच्या सुमारास घरी परत येत होते. त्यावेळी जुहूजवळ गाडीवरील नियंत्रण सुटल्याने त्यांची कार बीएमसीच्या कचऱ्याच्या ट्रकला मागून धडकली. आरोपी कार चालक अर्ध्वयू हा मर्चंट नेव्हीत काम करतो.

मयत पल्लवी भट्टाचार्य ही मूळ पश्चिम बंगालमधील कोलकाता येथील रहिवासी होती. ती दिल्लीत एअर हॉस्टेस म्हणून काम करत होती. नुकतीच तिने एअरलाईन कंपनी चेंज केली. निवडीनंतर तिला टॅटू काढण्यास सांगण्यात आले. लेझर टॅटू रिमूव्हल प्रोसेससाठी तिने दिल्लीहून मुंबई गाठली.

गर्भवती प्राध्यापिकेने आयुष्य संपवलं, पतीच्या व्हॉट्सअप चॅटमुळे अनैतिक संबंध कोर्टात उघड
बुधवारी रात्री पल्लवी, अर्ध्वयू आणि त्यांचे दोन मित्र भारती राय आणि अंकित खरे साकीनाक्यातील एका रेस्टोबारला पार्टीसाठी गेले होते. पहाटे अडीच वाजेपर्यंत पार्टी केल्यानंतर अर्ध्वयूच्या आईच्या मालकीच्या बीएमडब्ल्यू कारने ते घरी निघाले.

एसटी चालकाचा महामार्गावर अंदाज चुकला अन् बस थेट रस्ते दुभाजकावर चढली; ४७ प्रवासी थोडक्यात बचावले

जुहू पोलिस स्टेशनच्या आवारातील अरुंद लेनमध्ये पोहोचले तेव्हा अर्ध्वयूला स्पीड ब्रेकर लक्षात आला नाही आणि आधीच वेगात असलेल्या बीएमडब्ल्यू कारवरील त्याचे नियंत्रण सुटले आणि ती बीएमसीच्या कचरा गोळा करणाऱ्या ट्रकवर आदळली. सुदैवाने या ट्रकवर चालक किंवा क्लीन-अप मार्शल नव्हते.

पदरात पाच महिन्यांची लेक, निवृत्त पोलिसाच्या सुनेचा गूढ मृत्यू, माहेरच्या मंडळींना संशय
BMW मधील सर्वजण या अपघातात गंभीर जखमी झाले होते. तर पल्लवी भट्टाचार्यला रुग्णालयात दाखल करण्यापूर्वी मृत घोषित करण्यात आले. उर्वरित तिघे जण सध्या कूपर रुग्णालयात उपचार घेत आहेत. पल्लवीचे कुटुंबीय मुंबईत दाखल झाले असून त्यांनी जुहू पोलीस ठाण्यात कार चालक बांदेकर विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पाहा अपघाताचा व्हिडिओ

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed