• Mon. Nov 25th, 2024

    उंचच उंच पिक, कणसं ३ फुटांहून अधिक लांब; तुर्की बाजरीबद्द्ल ऐकलंय का? धुळ्याच्या शेतकऱ्याचा अफलातून प्रयोग

    उंचच उंच पिक, कणसं ३ फुटांहून अधिक लांब; तुर्की बाजरीबद्द्ल ऐकलंय का? धुळ्याच्या शेतकऱ्याचा अफलातून प्रयोग

    धुळे : धुळे तालुक्यातील बोरीस येथील शेतकरी डॉक्टर अनिल जैन यांनी तुर्की देशी वाण ही उन्हाळी बाजरीची पेरणी केली आणि यातून लाखो रुपयांचे उत्पन्न मिळवले आहे. एका एकरमधून ३० क्विंटल बाजरीचे उत्पादन त्यांनी घेतले. यामुळे ही तुर्की बाजरी बघण्यासाठी शेतकरी डॉ. अनिल जैन यांच्या शेतात गर्दी करीत आहे.खानदेशातील बोरीस हे गाव सती मातेच्या यात्रेसाठी प्रसिद्ध आहे. याच गावातील शेतकरी डॉ. अनिल जैन हे सध्या तुर्कीच्या बाजरीमुळे तालुक्यात चांगलेच चर्चेत आले आहेत. त्यांनी तुर्की देशी वाण बाजरीचा जानेवारी महिन्यात पेरा केला होता. ही बाजरी आता काढणीला आली आहे. डॉक्टर अनिल जैन यांनी दहा एकर शेतात विविध प्रयोग करत यंदा या बाजरीचा प्रयोग यशस्वी केला आहे.

    डॉक्टर अनिल जैन यांनी यावर्षी तुर्की देशातील बाजरीचे बियाणे मिळवले. या बाजरीची उंची १० ते ११ फुटांपर्यंत वाढली आहे. यात ३ फुटांपेक्षा अधिक लांबीची कणसे आली आहेत. अधिक लांबीची कणसे आणि परिपूर्ण भरलेले दाणे, यामुळे त्यांना एका एकरमध्ये ३० क्विंटल पेक्षा अधिक उत्पादन अपेक्षित आहे. चाळीस हजार रुपये प्रति क्विंटल या दराने या बाजरीची विक्री होणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.

    बँकॉकवरुन रोपं आणली, तरुणानं करुन दाखवलं,ऑर्किड फुलशेतीतून लाखोंची कमाई, इंजिनिअर शेतकऱ्याची सक्सेस स्टोरी
    एका एकरमागे १२ लाख रुपयांचे उत्पादन त्यांना अपेक्षित आहे. ही तुर्की बाजरी बघण्यासाठी शेतकऱ्यांची मोठी गर्दी डॉ. अनिल जैन यांच्या शेतात होत आहे. शेतात आधुनिक प्रयोग करून शेतकऱ्यांनी विकसनशील व्हावं यासाठी मोठ्या प्रमाणावर प्रयत्न केले जातात. मात्र, डॉ. अनिल जैन यांनी कृतीतून आधुनिक शेतीचा प्रयोग यशस्वी केला आहे. इतर शेतकऱ्यांनीही या माध्यमातून विकसनशील प्रयोग करावेत, असं आवाहन डॉक्टर अनिल जैन यांनी केलं आहे.

    हळदीच्या दराबाबत नवी अपडेट, नांदेडच्या बाजारात विक्रमी आवक,मोजणीसाठी लागले तब्बल दोन दिवस
    यंदा अतिवृष्टीमुळं धुळे जिल्ह्यातील शेकडो शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे. अतिवृष्टीमुळं गहू, बाजरी, मका, सोयाबीन, कापूस या पिकांचं मोठं नुकसान झालं आहे. अतिवृष्टीमुळे अनेक ठिकाणी बाजरी काळी पडली आहे, परिणामी तिची विक्री होत नसल्यानं शेतकरी आर्थिक विवंचनेत आहेत.

    पावसाळी बाजरीचे उत्तर महाराष्ट्रात उत्पादन घटल्याने सध्या राजस्थान, गुजरात, हरयाणा, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश आदी भागांतून बाजरी विक्रीसाठी महाराष्ट्रात येत आहे. हॉटेल व्यावसायिक, स्थानिक नागरिक, शहरी भागातील चाकरमान्यांकडून बाजरीला मोठी मागणी आहे. या बाजरीला सध्या दोन हजार सातशे रुपयांपर्यंतचा दर मिळत आहे.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *