• Mon. Nov 25th, 2024

    पहाटे तीन जण आले, सुरक्षारक्षकाच्या डोक्याला पिस्तुल लावलं अन् पुण्याच्या सोरतापवाडीत खळबळ

    पहाटे तीन जण आले, सुरक्षारक्षकाच्या डोक्याला पिस्तुल लावलं अन् पुण्याच्या सोरतापवाडीत खळबळ

    Authored by दीपक पडकर | महाराष्ट्र टाइम्स.कॉम | Updated: 15 May 2023, 4:35 pm

    Pune Sortapwadi Car Theft News : पुणे जिल्ह्यात गुन्ह्यांच्या घटनांमध्ये सतत वाढ होत आहे. कोयता गँग आणि खुनाच्या घटना समोर येत आहेत. आता उरुळी कांचन येथील एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

     

    पहाटे तिघे आले, सुरक्षारक्षकाच्या डोक्याला पिस्तूल लावलं अन् घटनेनं उरुळी कांचन हादरलं
    पुणे : सुरक्षारक्षकाच्या डोक्याला पिस्तुल लावून चोरट्यांनी कार चोरून नेल्याचा धक्कादायक प्रकार उरुळी कांचन जवळील सोरतापवाडी येथून समोर आला आहे. येथील शिव मोटर्स कार बजारात आज पहाटे साडेचार वाजता चोरीचा हा प्रकार घडला आहे.याप्रकरणी शिव मोटर्सचे मालक महादेव विठ्ठल झरांडे (वय २५) यांनी उरुळी कांचन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानंतर तात्काळ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला आहे. चोरट्यांनी अंदाजे ४ लाख रुपये किंमतीची स्विफ्ट डिझायर गाडी नं. MH12-HZ-3737 कार चोरून नेली आहे. अज्ञात चोरट्यांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेतला आहे.

    Pune Crime : अमरावतीच्या त्या आयटी इंजिनिअरची पुण्यात हत्या; खूनाचं धक्कादायक कारण समोर…
    फिर्यादी झरांडे यांचे सोरतापवाडी येथे कार बाजारात शिव मोटर्स हे कार खरेदी विक्रीचे दुकान आहे. रविवारी १४ मे रोजी पहाटे साडेचार वाजता या कार बाजारात तीन चोरटे आले. दरम्यान, धारदार हत्यारे आणि बंदूक जवळ असलेल्या चोरट्यांनी कार बाजारात असलेल्या निवृत्ती देवके (वय ४५) या सुरक्षा रक्षकाच्या डोक्याला पिस्तुल लावली आणि स्विफ्ट डिझायर कार चोरून नेली, अशी माहिती मिळाली आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.
    Pune Girls Drown : लग्नासाठी पाहुण्या आलेल्या दोन मुलींचा खडकवासला धरणात बुडून मृत्यू
    दरम्यान, वर्षापूर्वी याच ठिकाणावरून एक मारुती सुझुकी या कंपनीची इर्टिगा ही कार चोरीला गेली होती. याप्रकरणी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र तिचाही अद्याप शोध लागला नाही. त्यामुळे परिसरात घबराटीचे वातावरण पसरले आहे. चोरी गेलेल्या गाड्यांचा शोध कधी लागणार? असा प्रश्न नागरिक विचारू लागले आहेत.

    जवळच्या शहरातील बातम्या

    Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed