• Sat. Sep 19th, 2026

Ratnagiri News: ऐन गणेशोत्सवात रत्नागिरीत मोठी कारवाई; गोवा बनावटीच्या बनावट दारूच्या कारखान्यावर छापा, १ कोटींचा साठा जप्त

Ganesh Festival: या प्रकरणाचा पुढील तपास राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून सुरू आहे. राज्य उत्पादन शुक्र विभागाने केलेल्या या मोठ्या कारवाईचे स्वागत केले जात आहे.

ऐन गणेशोत्सवात रत्नागिरीत मोठी कारवाई; गोवा बनावटीच्या बनावट दारूच्या कारखान्यावर छापा(फोटोLipi)
प्रसाद रानडे, रत्नागिरी: ऐन गणेशोत्सवात उत्पन्न शुल्क विभागाने कोकणात मोठी कारवाई केली आहे. दारूचा कारखाना उद्ध्वस्त करत तब्बल एक कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त केल्याने मोठी खळबळ उडाली आहे. रत्नागिरी-सिंधुदुर्ग भरारी पथकाने ही मोठी कारवाई केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, राज्य उत्पादन शुल्क विभागाने मोठी कारवाई करत राजापूर तालुक्यातील तळगाव येथे सुरू असलेल्या गोवा बनावटीच्या बनावट दारूच्या मिनी कारखान्याचा पर्दाफाश केला आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या रत्नागिरी-सिंधुदुर्ग भरारी पथकाने तळगाव येथे छापा टाकत तब्बल १ कोटी रुपयांचा गोवा बनावटीच्या दारूचा साठा आणि संबंधित साहित्य जप्त केल्याची माहिती आहे.

या कारवाईदरम्यान जागा मालक दिनेश जैतापकर आणि गोव्यातील चंदन पाटील या दोघांना ताब्यात घेण्यात आले आहे. गोवा बनावटीच्या दारूची नक्कल करून ती तयार करण्यासाठी या ठिकाणी मिनी कारखाना सुरू असल्याचे राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कारवाईत समोर आले आहे. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर दारूची अवैध विक्री आणि वाहतूक रोखण्यासाठी सुरू असलेल्या कारवाईदरम्यान ही मोठी कारवाई करण्यात आली. ताब्यात घेण्यात आलेल्या दोन्ही संशयितांना पुढील कायदेशीर प्रक्रियेसाठी न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.

दरम्यान, यापूर्वी मुंबई गोवा महामार्गावरही अवैध दारू साठ्यावर कारवाई करण्यात आली होती. काही दिवसांपूर्वी एका अवजड कंटेनरमधून काही लाखांची अवैध दारू जप्त करण्यात आली होती. अनेकदा यापूर्वी कारवाया करण्यात आल्या आहेत. दारूप्रमाणे गांजा ,एमडी, चरस आदी अमली पदार्थांमुळे जिल्ह्यात युवा पिढी व्यसनाधीन होण्याचा धोका निर्माण झाला आहे. जिल्ह्यात होणारी अंमली पदार्थांची वाहतूक हा गंभीर चिंतेचा विषय ठरला आहे. या पार्श्वभूमीवर कोकणात एक्ससाइज व गृह विभाग यांनी संयुक्तरित्या या कारवाया कराव्यात, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.

अक्षय शितोळे

लेखकाबद्दलअक्षय शितोळेअक्षय शितोळे हे २०१८ पासून डिजिटल मीडियात कार्यरत असून सध्या मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. राज्यभरातील रिपोर्टर्ससोबत समन्वय साधत महाराष्ट्रातील गावगाड्यापासून मोठ्या शहरांमधील दैनंदिन घडामोडी मटा ऑनलाइनसाठी वेगवान आणि अचूक पद्धतीने मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. राजकीय बातम्यांमध्ये विशेष रस, बातम्यांमागची बातमी अर्थात घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेण्याचा सातत्याने प्रयत्न असतो. शेती आणि ग्रामीण जीवन हे जिव्हाळ्याचे विषय आहेत.

पत्रकारितेतील अनुभव
अक्षय शितोळे यांनी २०१८ मध्ये आपल्या पत्रकारितेतील प्रवासाचा प्रारंभ केला. सुरुवातीला न्यूज १८ लोकमत या वेबसाईटसाठी काम करताना ट्रेनी, सब एडिटर असा त्यांचा प्रवास राहिला. या कार्यकाळात प्रामुख्याने राजकीय बातम्यांसह स्थानिक पातळीवरील विविध घडामोडी कव्हर करण्याचे काम त्यांनी केले. २०१९ च्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध राजकीय घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेतला. पुढे २०२१ मटा ऑनलाइनमध्ये डिजिटल कंटेट प्रोड्युसर म्हणून जॉइन झाले. यावेळी राजकीय बातम्यांसह विविध जिल्ह्यांतील प्रतिनिधींशी समन्वय ठेवत वेबसाईटसाठी वेगवान आणि अचूक बातम्या मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न राहिला. तसंच मटा ऑनलाइनला २५ वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी महाराष्ट्राच्या दोन दशकांच्या सामाजिक वाटचालीचा आढावा घेणारा विशेष लेख लिहिला होता. “आरक्षणाचे लढे आणि तिढे, टोकदार जातीय अस्मिता ; २५ वर्षांत कसं ढवळून निघालं महाराष्ट्राचं समाजमन?” शीर्षकाखाली लिहिलेल्या या लेखाच्या माध्यमातून महाराष्ट्रात मागील २५ वर्षांत जी सामाजिक स्थित्यंतरे झाली, ज्या घटनांनी महाराष्ट्राच्या सामाजिक रचनेवर परिणाम केला, अशा घडामोडींचा सविस्तर आढावा घेतला होता. २०२३ मध्ये त्यांनी लोकमत ऑनलाइनसोबतही काम केले असून ते २०२५ पासून पुन्हा मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिलट कंटेंट प्रोड्युसर म्हणून रुजू झाले. विविध जिल्ह्यांतील रिपोर्टर्ससोबत संवाद साधत स्थानिक घडामोडींसह राज्यभरात महत्त्वाच्या बातम्या कव्हर करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. तसंच विश्लेषणात्मक व्हिडिओच्या माध्यमातून राजकीय घटनांचे अन्वयार्थ प्रेक्षकांसमोर उलगडण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. महाराष्ट्रात २०२५-२६ साली झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध विश्लेषणात्मक व्हिडिओंच्या माध्यमातून राजकीय घडामोडींचं सोप्या शब्दांत विश्लेषण केले. तसंच महानगरपालिका निवडणूक निकालानंतर राजकीय विश्लेषकांची मुलाखत घेत या निवडणूक निकालाचा वेध घेण्याचा प्रयत्न केला.

मुलाखतीची लिंक: Uddhav Thackeray यांचा BMC मध्ये का झाला पराभव? सविस्तर विश्लेषण – https://youtu.be/8UeV9w1vwxQ?si=2sMWoovyx07EpjVU

शैक्षणिक पात्रता
अक्षय शितोळे यांनी १२ वी पर्यंतचे शिक्षण आपल्या मूळ गावी घेतले असून नंतर त्यांनी मुंबई येथील नामांकित असलेल्या रुईया महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी (Bachelor of mass media) चे शिक्षण पूर्ण केले.… आणखी वाचा