• Sat. Sep 21st, 2024

जालना हत्या प्रकणाला कलाटणी, खरा आरोपी पुढे येताच पोलिसही चक्रावले, धक्कादायक सत्य उघड

जालना हत्या प्रकणाला कलाटणी, खरा आरोपी पुढे येताच पोलिसही चक्रावले, धक्कादायक सत्य उघड

जालना: जालना शहराच्या टीव्ही सेंटर भागातील ४० वर्षीय प्रमोद झिने यांचा ७ मे रोजी सकाळी निर्घृणपणे खून करण्यात आला होता. याप्रकरणात मयताची पत्नी आशा झिने हिने केलेल्या तक्रारीवरुन त्याच भागातील एका महिलेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्या अनुषंगाने पोलिसांनी तत्काळ पावले उचलत संबंधित महिलेला अटकही केली होती. आशा हिने दिलेल्या तक्रारीत प्रमोद झिने याचे त्या महिलेसोबत अनैतिक संबंध होते. त्यातूनच त्या महिलेने प्रमोद याचा खून केल्याचं तिने तक्रारीत म्हटले होते.दरम्यान, प्रमोद झिने यांच्या खून प्रकरणातील खऱ्या आरोपीचा पर्दाफाश करण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक सुभाष भुजंग यांनी या गुन्ह्यातील खऱ्या आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहेत.

धुमधडाक्यात लग्न, दुसऱ्याच दिवशी नववधू खोलीतून ओरडत बाहेर आली, सत्य कळताच लग्नघरी सन्नाटा…
मृत प्रमोद झिने यांची पत्नी आशाचे रेवगाव येथील रुपेश योहानराव शिंदे यांच्यासोबत अनैतिक संबंध होते. त्यांच्या अनैतिक संबंधात प्रमोद याचा अडसर होऊ लागल्याने अशा झिने आणि रुपेश शिंदे यांनी गेल्या महिन्यातच प्रमोद याच्या खुनाचा कट रचला होता. ६ मे च्या रात्री प्रमोद मद्यप्राशन करून झोपले आसल्याची संधी चालून येताच आशा हिने तिचा प्रियकर रुपेश शिंदे यास बोलावून घेतले.

प्रमोद यांचा झोपेतच डोक्यावर, मानेवर, कानावर तसेच शरीरावर धारदार शस्त्राने वार करून खून केल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले. पोलिस अधीक्षकांच्या निवासस्थानापासून हाकेच्या अंतरावर झालेल्या या खुनाने टिव्ही सेंटर परिसरात खळबळ माजली होती. स्थानिक गुन्हे शाखेने मयताची पत्नी आशा झिने आणि तिचा प्रियकर रुपेश शिंदे या दोघांना ताब्यात घेऊन तालुका जालना पोलिसांच्या स्वाधीन केले आहे. पोलिस अधीक्षक डॉ. अक्षय शिंदे, अप्पर पोलीस अधीक्षक राहुल खाडे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुभाष भुजंग यांच्यासह पथकाने या खुनातील खऱ्या आरोपीचा छडा लावला आहे.

मित्र-मैत्रिण फिरण्यासाठी गेले, रस्त्यातच नराधमांनी अडवलं, एकाने छेड काढली, दुसऱ्याने गोळी घातली

या खूनप्रकरणात तक्रारदार आशा झिने हिच्या तक्रारीनुसार आरोपी महिलेला अटक करण्यासाठी तालुका जालना पोलिसांनी न्यायालयाकडे परवानगी मागितली होती. तेव्हाच न्यायालयाला हे प्रकरण संशयास्पद वाटल्याने न्यायालयाने त्या महिलेच्या अटकेला परवानगी नाकारली होती. आता पोलिसांनी चक्रे फिरवून खऱ्या खुनी महिलेचा पर्दाफाश केला आहे. प्रमोद याच्या पत्नीनेच तिच्या अनैतिक संबंधात अडसर होऊ लागलेल्या पतीचा खून करून घेतल्याने परिसरात चर्चांना उधाण आले आहे.

पत्नीला संपवलं, पलंगात लपवलं; दोन दिवस त्याच पलंगावर झोपला… पण एक चूक अन् सारा डाव फसला

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed