बुलडाणा : चिखली तालुक्यातील तपोवन देवी मंदिर परिसरातून हरवलेल्या ६ वर्षीय मुलीचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. राधिका विलास इंगळे असे या मुलीचे नाव असून तिचा मृतदेह तपोवन मंदिर परिसरातील मागील भागात आढळून आला आहे. बाळापूर येथील मूळ निवासी असलेले विलास इंगळे आपल्या परिवारासह एका लग्नानिमित्त चिखली परिसरात आले होते. दरम्यान काल सकाळी ११ वाजेपासून राधिका हरवली होती.राधिका हरवल्यापासून तिचा शोध युद्ध पातळीवर सुरू होता. बुलढाणा जिल्हा पोलीस प्रशासनासह अनेक सामाजिक कार्यकर्त्यांनी ठिकठिकाणी राधिकाचा शोध घेणे सुरू केले होते. आज दुपारी तीन वाजेच्या दरम्यान तपोवन देवीच्या मंदिर परिसरातील मागील भागात तिचा मृतदेह आढळून आला.
अग्निशमन साधने तयार करणाऱ्या कारखान्यात स्फोट, दोन कामगारांचा होरपळून मृत्यू, दोघे जखमी
राधिकाचा मृतदेह आढळला तेव्हा तिचा चेहरा पूर्णपणे ठेचण्यात आलेला दिसत होता. अंगावरचे सर्व कपडे व्यवस्थित असल्याचे पोलिसांनी सांगितले. मंदिराच्या मागील परिसर डोंगराळ असून ५०० मीटर अंतरावर राधिकाचा मृतदेह सापडला. आज दुपारी जवळपास दोनशे ते अडीचशे लोकांनी संपूर्ण मंदिर परिसराचा शोध घेण्यास सुरुवात केली होती. तेव्हा राधिका आढळून आली.
११ दिवसांपासून बेपत्ता होता तरूण, विहिरीत पाहताच बसला धक्का, दृश्य पाहणंही थरकाप उडवणारं
राधिका या अवघ्या ६ वर्षीय चिमुरडीची हत्या कोणी व का केली याचा उलगडा अद्याप होऊ शकलेला नाही. या प्रकरणी पुढील तपास पोलीस करित आहे.
काय आक्रित घडलं?, पोलिसांनी बार्शीत गौतमी पाटीलचा शो बंद पाडला; चाहत्यांनी ऐकले फक्त एकच गाणे