नवी मुंबई : नवी मुंबई महानगरपालिका परिसरातील एका सार्वजनिक स्वच्छतागृहाचा वापर करताना एका महिलेचे मोबाइलवर गुपचूप शूटिंग करणाऱ्याला एनआरआय पोलिसांनी जेरबंद केले आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून पोलीस अधिक तपास करत असल्याची माहिती आहे.मिळालेल्या माहितीनुसार, सार्वजनिक शौचालयात जाणाऱ्या महिलांचे मोबाईलवरून व्हिडिओ चित्रिकरण करणाऱ्या विकृत तरुणाला नागरिकांनी पकडून पोलिसांच्या स्वाधीन केल्याची घटना घडली. राजस राणे (२४) असे या तरुणाचे नाव असून एनआरआय पोलिसांनी त्याच्या विरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करुन त्याला ताब्यात घेतले आहे. तसेच त्याने ज्या मोबाईलवरून शौचालयातील महिलांचे चित्रीकरण केले, तो मोबाईल फोन जप्त केला आहे. सदर घटना सीबीडी-बेलापूर येथील नवी मुंबई महापालिका मुख्यालयाबाहेर असलेल्या सार्वजनिक शौचालयात घडल्याची माहिती पोलिसांनी दिली.
सदर प्रकरणातील ३० वर्षीय तक्रारदार महिला उलवे येथे राहण्यास असून १० मे रोजी मध्यरात्री १२ वाजण्याच्या सुमारास ती मुंबई येथून पतीसह कारने उलवे येथे येत होती. यावेळी सदर महिला शौचासाठी सीबीडीतील किल्ले जंक्शन येथील नवी मुंबई महापालिका मुख्यालया बाहेरील सार्वजनिक शौचालयात गेली होती. यावेळी तिचा पती कार घेऊन रस्त्यावर उभा होता. दरम्यान, शौचालयात गेलेल्या या महिलेला मोबाईलचा प्रकाश दिसल्याने तिने छताकडे पाहिले असता, बाजुच्या शौचालयातून वरच्या बाजुने एक तरुण मोबाईलद्वारे व्हिडीओ चित्रीकरण करत असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे तिने तत्काळ आरडा- ओरड करुन शौचालयातून बाहेर पळ काढला. त्यानंतर तिने आपल्या पतीला त्याबाबतची माहिती दिली.

यानंतर सदर महिलेने आणि तिच्या पतीने बाजूच्या शौचालयातील दरवाजा वाजवला. मात्र, आतून काहीच प्रतिसाद मिळाला नाही. मात्र, १० मिनिटानंतर शौचालयातून राजस राणे नामक तरुण बाहेर आला. त्यानंतर तेथे जमलेल्या नागरिकांनी एनआरआय पोलिसांना पाचारण करन त्याला पोलिसांच्या स्वाधीन केले. यावेळी पोलिसांनी राजस राणे याच्या मोबाईलची तपासणी केली असता, त्याच्या मोबाईलमध्ये त्याच शौचालयातील आणखी एका महिलेचे मोबाईलवरून काढण्यात आलेले व्हिडीओ चित्रीकरण आढळून आले. त्यानंतर पोलिसांनी महिलेच्या तक्रारीवरून राजस राणे याच्या विरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करुन त्याला ताब्यात घेतले आहे.