तिघे मित्र शुक्रवारी (दि. १२) मध्यरात्री दोन वाजताच्या सुमारास दुचाकीवरून भरधाव वेगात सिडकोतून त्र्यंबक रोडकडे येत होते. ते जिल्हा रुग्णालया जवळ आले असता राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या धावत्या बसच्या टूलबॉक्सवर पाठीमागून जाऊन आदळले. त्यात गंभीर जखमी होऊन दुचाकी वरील दोघांचा मृत्यू झाला.
दरम्यान, तिघेही विद्यार्थी संदीप फाउंडेशनच्या अभियांत्रिकी महाविद्यालयात पदवीचे शिक्षण घेत होते. जेवण करण्यासाठी तिघे जण एकाच दुचाकीवरून नवीन सीबीएस परिसरात आले. ते जिल्हा रुग्णालयाकडून त्र्यंबक नाक्याच्या दिशेने भरधाव वेगात जात असताना बस स्थानकात वळण घेणाऱ्या बसवर जाऊन आदळल्याने हा अपघात झाला.
या घटनेची माहिती मिळताच सरकार वाडा पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी आणि कर्मचारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले पोलिसांनी पंचनामा करून गुन्हा दाखल केला.
रात्रीची वेळ असल्याने हॉटेल बंद होईल आणि जेवण मिळणार नाही म्हणून दुचाकीवर वेगात जात असताना हा अपघात घडला आणि दुचाकी वरील तिघा मित्रांमधील दोघांचा दुर्दैवाने जागेवरच मृत्यू झाला. तर यात तिसरा मित्र गंभीर जखमी झाला असून त्याची प्रकृती देखील चिंताजनक असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. शुभम सोनवणे आणि शुभम कोकाटे हे दोन्ही कुटुंबातील एकुलती एक मुले होती.