दरम्यान घटनास्थळी मृतदेहाचे स्पॉट शवविच्छेदन करून नातेवाईकांना अंत्यसंस्कारासाठी ते ताब्यात देऊन घटनास्थळीच अंत्यसंस्कार करण्यात आले.
हातातील कड्यावरून पटली ओळख
शीर धडावेगळे असलेला अविनाशचा मृतदेह विहिरीच्या बाहेर काढल्यावर त्याची ओळख पटविण्याचे आव्हान पोलिसांसमोर होते. दरम्यान बेपत्ता असलेल्या लहान भावाचा मोठ्या भावासह नातेवाईकांकडून शोध सुरू होता. विहिरीत मृतदेह आढळून आल्याची माहिती मिळाल्यावर नातेवाईकांनी घटनास्थळ गाठलं. हातातील चांदीच्या कड्यावरून मृतांची ओळख पटविली आहे. तो अविनाश असल्याचे निष्पन्न झाले.
शवविच्छेदनासाठी पोलीस पाच तास ताटकळले
दरम्यान विहिरीत तरंगत असलेला कुजलेला मृतदेह बाहेर काढल्यावर शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला. मात्र सोयगाव ग्रामीण रुग्णालयासह जरंडी, बनोटी या प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय सर्जन न मिळाल्याने अखेरीस कन्नड तालुक्यातील नागद प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ निकुंभ यांना शवविच्छेदनासाठी घटनास्थळी पाचारण करून शवविच्छेदन करण्यात आले. त्यामुळे पोलिसांना पाच तास घटनास्थळी ठाण मांडून बसावे लागले.
बेपत्ता अविनाश याची ११ दिवसानंतर थेट मृत्यूची बातमी मिळाली
मृत अविनाश तडवी याने नुकतीच इयत्ता बारावीची परीक्षा दिलेली होती. तो १ मे पासून घरातून निघून गेलेला होता. ११ दिवसानंतर थेट त्याच्या मृत्यूची बातमी मिळाल्याने कुटुंबीयांचा आक्रोश मन हेलावणारा होता. मृत अविनाशच्या पश्चात आई-वडील, दोन भाऊ एक बहीण असा परिवार आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक अनमोल केदार यांच्या मार्गदर्शनाखाली जमादार राजू बर्डे रवींद्र तायडे आदी करत आहे.