• Sat. Sep 21st, 2024

घरात पाण्याची मोटार लावणे जीवावर बेतले, विजेचा धक्का लागला, १४ वर्षीय मुलीचा दुदैवी मृत्यू

घरात पाण्याची मोटार लावणे जीवावर बेतले, विजेचा धक्का लागला, १४ वर्षीय मुलीचा दुदैवी मृत्यू

जळगाव: यावल तालुक्यातील कोळवद गावात एका आदिवासी कुटुंबातील चिमकुलीस पाण्याची मोटार लावताना विजेचा धक्का लागल्याने तिचा मृत्यू झाला. ही दुदैवी घटना शुक्रवारी सकाळी घडली आहे. मुस्कान संजय तडवी (वय १४) असे मृत चिमुकलीचे नाव आहे. या घटनेमुळे गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.यावल तालुक्यातील कोळवद या गावात संजय बिस्मिल्ला तडवी हे आपल्या कुटुंबीयांसोबत राहतात. संजय तडवी यांची मुलगी मुस्कान तडवी ही शुक्रवार १२ मे रोजी सकाळी साडे आठ ते नऊ वाजण्याच्या दरम्यान आपल्या घरात पाणी भरण्यासाठी पाण्याची मोटर लावत होती. या वेळी मोटारीत विजेचा प्रवाह उतरल्याने तिला जोरदार विजेचा धक्का लागला. या घटनेत तिचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

मुख्यमंत्री शिंदे श्री रामाच्या वेशभूषेत, झळकला बॅनर, ठाण्यात दक्षिण भारतीयांचे समर्थन
या दुर्दैवी घटनेनंतर कुटुंबाने गावातील मंडळीच्या मदतीने तत्काळ मुस्कान हिला यावल येथे खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी करून तिला मृत घोषीत केले.

फोन पेवर पैसे पाठवताना २ ऐवजी ३ नंबर दाबला; एकाने घेतला महिलेचा गैरफायदा, महिला हादरली
मुस्कान तडवी ही अत्यंत गरीब आदिवासी कुटुंबातील मुलगी होती. मुस्कान तडवी ही विकास विद्यालय (सातोद ता- यावल) येथे आठवीच्या वर्गात शिक्षण घेत होती. तिच्या अशा अपघाती मृत्यु झाल्याने गावात सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. मुस्कान हिच्या कुटुंबास शासनाकडून काहीतरी मदत मिळावी, मदत मिळाल्यास कुटुंबाला हातभार लागेल अशी अपेक्षा परिसरातील आदीवासी बांधवांकडून व्यक्त करण्यात येत आहे.

काँग्रेसचे नेते संतोष रावत यांच्यावर गोळीबार, चंद्रपुरात राजकीय वर्तुळात मोठी खळबळ

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed