• Sat. Sep 21st, 2024

सोशल मीडियावर मैत्री पडली महागात, मुलीला न्यूड फोटो टाकण्यास भाग पाडले, केले ब्लॅकमेल

सोशल मीडियावर मैत्री पडली महागात, मुलीला न्यूड फोटो टाकण्यास भाग पाडले, केले ब्लॅकमेल

नाशिक : शहरात राहणाऱ्या एका अल्पवयीन मुलीला सोशल मीडियावर मैत्री करणे चांगलेच महागात पडले आहे. अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी देणाऱ्या तिच्या सोशल मीडियावरील दोघा मित्रांना विरुद्ध तिने दिलेल्या तक्रारीवरून सरकार वाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेने शहरात खळबळ उडाली आहे.या बाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, नाशिक शहरातील अशोकस्तंभ भागात राहणाऱ्या अल्पवयीन पीडित मुलीची इस्टाग्राम आणि स्नॅपचॅट या सोशल साईटच्या माध्यमातून संशयितांशी ओळख झाली होती. त्यांच्या मैत्रीत रोजच ऑनलाईन पद्धतीने संवाद होत असल्याने संशयितांनी मुलीच्या अज्ञानपणाचा फायदा उचलत तिला न्यूड फोटो टाकण्यास भाग पाडले. त्यानंतर गेल्या आठवड्यात संशयितांनी अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी देत मुलीकडे शरीरसुखाची आणि पैश्यांची मागणी केली होती.

जालन्यात धक्कादायक घटना! पत्नीची हत्या करत पतीने स्वत:लाही संपविले, दोन चिमुरडी झाली पोरकी
दरम्यान, पीडित मुलीने पोलिसात धाव घेत संशयितांविरोधात तक्रार दाखल केली. पीडितेने दिलेल्या तक्रारीवरून सरकारवाडा पोलिस ठाण्यात विनयभंगासह आयटी अ‍ॅक्ट आणि बाल लैंगिक अत्याचार संरक्षण (पोक्सो) कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या मित्रांनी पैश्यांसह शरिर सुखाची मागणी करीत अल्पवयीन मुलीचा विनयभंग केला आहे. अथर्व शहाणे (२२ रा.औरंगाबाद) आणि सुहास जितेंद्र सराफ (२५ रा. सरस्वतीनगर, पंचक जेलरोड) अशी संशयितांची नावे आहेत.

घरात पाण्याची मोटार लावणे जीवावर बेतले, विजेचा धक्का लागला, १४ वर्षीय मुलीचा दुदैवी मृत्यू
मागच्या गेल्या काही दिवसांपूर्वी देखील नाशिक शहरात असाच एक प्रकार उघडकीस आला होता. अल्पवयीन मुलीशी सोशल मीडियाच्या माध्यमातून झालेल्या ओळखीचा गैरफायदा घेऊन तिच्या आई-वडिलांना जीवे मारण्याची धमकी देत तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याची खळबळ जनक घटना उघडकीस आली आहे. धक्कादायक बाब म्हणजे यात एका अल्पवयीन बालकाचा देखील समावेश होता. या प्रकरणी नाशिक शहरातील इंदिरानगर पोलीस ठाण्यात एक अल्पवयीन बालक आणि एका युवकावर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मुख्यमंत्री शिंदे श्री रामाच्या वेशभूषेत, झळकला बॅनर, ठाण्यात दक्षिण भारतीयांचे समर्थन
अशा घटना सातत्याने घडत असल्याने याबाबत वारंवार प्रबोधन करण्यात आले आहेत. परंतु तरीदेखील सोशल मीडियाच्या अती आहारी जाऊन अशा घटना घडत आहेत, नाशिक मध्ये पुन्हा एका अल्पवयीन मुलीला सोशल मीडियावर मैत्री करणे महागात पडले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed